शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कचरा कंटेनरचे परिसर स्वच्छ व सुशोभित करावेत : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 11:01 IST

कंटेनरसभोवती कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरात ३० ते ३५ डर्टी स्पॉट तयार झाले असून, आणखीन काही डर्टी स्पॉट असतील तर त्याची यादी तयार करून त्या ठिकाणची त्वरित स्वच्छता करावी, अशा सूचना महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या खुल्या जागेवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

ठळक मुद्देकचरा कंटेनरचे परिसर स्वच्छ व सुशोभित करावेत : महापौरतर भाजी विक्रेत्यावर कारवाई केली जाईल

कोल्हापूर : कंटेनरसभोवती कचरा टाकण्यात येत असल्यामुळे शहरात ३० ते ३५ डर्टी स्पॉट तयार झाले असून, आणखीन काही डर्टी स्पॉट असतील तर त्याची यादी तयार करून त्या ठिकाणची त्वरित स्वच्छता करावी, अशा सूचना महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महापालिकेच्या खुल्या जागेवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.शहरातील डर्टी स्पॉट सुशोभीकरण करण्यासाठी महापौर आजरेकर यांनी बैठक घेतली. कंटेनर सभोवतालच्या परिसरात झाडांच्या कुंड्या ठेवण्यात याव्यात. कंटेनरजवळील भिंतीवर स्वच्छ भारत अभियानाचे लोगो, प्रबोधनपर चित्रे रेखाटण्यात यावीत. नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात यावे. सेवाभावी संस्थांना संपर्क करून त्याठिकाणचा परिसर लोकसहभागातून सुशोभीकरण करण्यात यावा. डेंग्यू प्रतिबंधासाठी चॅनेल व नाले सफाई, स्वच्छतागृहांची सफाई दैनंदिन करण्यात यावी, अशा सूचना महापौरांनी केल्या.नागरिकांनी आपला कचरा घरातच साठवून ठेवून घंटागाडी आल्यावर कर्मचाऱ्यांकडे द्यावा, असे आवाहन करतानाच मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी, जर कचरा कंटेनरच्या बाहेर टाकला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.

सहायक आयुक्त चेतन कोंडे यांनी भाजी मार्केटमधील कचरा भाजी विक्रेत्यांना साठवून ठेवण्यास सांगू, पण जे कचरा साठवून ठेवत नसतील तर भाजी विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यावेळी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, हर्षिजत घाटगे उपस्थित होते

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर