शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : न्यायालये पुन्हा गजबजली, सोशल डिस्टन्स राखून कामकाज सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:45 IST

सुमारे तीन महिने बंद असलेले जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात सुरू झाली. कोल्हापूरातील न्यायसंकुलात आवारात वकिल व मोजक्याच पक्षकारांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. दिवसभरात सुमारे साडेतीनशेहून अधिक वकील आणि पक्षकारांनी हजेरी लावली. प्रत्येकाची नोंद करुनच मास्क आणि सॅनिटायझर करूनच न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला जात होता.

ठळक मुद्दे न्यायालये पुन्हा गजबजली, सोशल डिस्टन्स राखून कामकाज सुरु दोन सत्रात काम सुरु ; तपासणी करुनच वकीलांना प्रवेश

कोल्हापूर : सुमारे तीन महिने बंद असलेले जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात सुरू झाली. कोल्हापूरातील न्यायसंकुलात आवारात वकिल व मोजक्याच पक्षकारांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. दिवसभरात सुमारे साडेतीनशेहून अधिक वकील आणि पक्षकारांनी हजेरी लावली. प्रत्येकाची नोंद करुनच मास्क आणि सॅनिटायझर करूनच न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला जात होता.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तीन महिने न्यायालयीन कामकाज बंद झाले होते. फक्त अत्यावश्यकसाठी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे कामकाज सुरु राहीले. सोमवारपासून न्यायालयाचे अंशत: कामकाज सुरु झाले. पहिल्याच दिवशीच्या पहिल्या सत्रात वकीलांनी अधिक गर्दी होती.

सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यतच्या पहिल्या सत्रात दिवाणी तर दुपारी अडीच ते साडेपाच वाजेपर्यतच्या दुसऱ्या सत्रात फौजदारी खटले सुनावणीस घेण्यात येणार होते. प्रत्येक न्यायाधीशांकडे केवळ पंधरा सुनावण्या घेण्यात येणार होते. पहिल्या दिवशी कोणत्या खटल्यांची सुनावणी होणार याबाबतची माहिती बार असोसिएशनला दिली होती. त्यानुसार त्याची माहिती वकीलांपर्यत देण्यात आली होती, ज्यांच्या खटल्याची सुनावणी होणार त्यांनाच न्यायालयात प्रवेश देण्यात येणार होता. पण पहिल्या दिवशीच बहुतांशी वकिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयkolhapurकोल्हापूर