शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : डॉक्टरांच्या संपर्कातील ३२५ जण होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:39 IST

रंकाळा टॉवर येथील रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात प्रथम आणि दुय्यम असे ३२५ जण आले असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रंकाळा टॉवर, डांगे गल्लीचा काही परिसर सील केल्याने येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा अनेकांच्या व्यवसायांना फटका बसला आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या संपर्कातील ३२५ जण होम क्वारंटाईनरंकाळा टॉवर, डांगे गल्ली लॉक : परिसरातील अनेकांचे व्यवसाय बंद

कोल्हापूर : रंकाळा टॉवर येथील रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात प्रथम आणि दुय्यम असे ३२५ जण आले असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रंकाळा टॉवर, डांगे गल्लीचा काही परिसर सील केल्याने येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा अनेकांच्या व्यवसायांना फटका बसला आहे.डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे. त्यांच्या दुय्यम संपर्कात आलेल्यांनाही १४ दिवस क्वारंटाईन होण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत. डांगे गल्ली येथील नरसोबा सेवा मंडळ येथील दोन गल्ली बॅरिकेड‌्स लावून सील केल्या आहेत. विशेषत: रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर हा कोकणाला जोडणारा मुख्य मार्ग आहे. हा मार्गच बंद असल्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतुकीची कोंडी होत आहे.बँक, एटीएम बंदरुग्णालयासमोरच राष्ट्रीयीकृत बँक असून त्यांचे एटीएम सेंटरही आहे. या बँकेत नेहमी नागरिकांची गर्दी असते. या परिसरात नागरिकांना येण्यास प्रतिबंध केल्यामुळे बँकेने शाखा आणि एटीएम सेंटर बंद केले आहे. ग्राहकांना टिंबर मार्केट, दसरा चौक आणि साने गुरुजी शाखेतून व्यवहार करण्याचे फलक लावले आहे.व्यावसायिकांना फटकागेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे दुकाने बंद होती. लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत व्यवसाय सुरू होते. कोरोनाचे रुग्ण सापडल्यामुळे दोन दिवसांपासून रंकाळा टॉवर येथील सर्व दुकाने बंद आहेत. यामुळे येथील व्यावसायिक अडचणीत सापडले आहे. याच मार्गावर अनेक हॉस्पिटलही असून त्यांच्यावरही याचा परिणाम झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर