शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा वाढता वेग, दुसऱ्या लाटेची चिन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 12:57 IST

CoronaVirus Kolhapur- गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची दुसरी लाट घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता वेग, दुसऱ्या लाटेची चिन्हे  नवे ८० रुग्ण, प्रशासन सतर्क; नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची दुसरी लाट घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

गेल्या २४ तासांत नवीन ८० कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे. फक्त कोल्हापूर शहरात तब्बल ४२ नवे रुग्ण आढळल्याने हा विषय गांभीर्याने घेण्याची प्रशासनावर वेळ आली आहे. सुदैवाने, दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.जिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठवडाभरात वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत तब्बल ८० नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही ५१ हजार २८७ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात ३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५१४ रुग्णावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासांत ४२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. करवीर तालुक्यात पाच, हातकणंगले व गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी चार, भुदरगड व राधानगरी तालुक्यात प्रत्येकी दोन, तर चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यांत प्रत्येकी एका नव्या रुग्णाची वाढ झाली आहे.आठवडाभरात वाढते नवे रुग्णसंख्या

  • सोमवार- ३८
  • मंगळवार- २५
  •  बुधवार- ४६
  • गुरुवार- ६२
  • शुक्रवार- ८३
  • शनिवार- ८१
  •  रविवार- ८० 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर