शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : मास्क घाला; अन्यथा ५०० रुपयांची पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 11:13 IST

मास्क घालत नसणाऱ्यांनी आता सावध राहावे; कारण आज, बुधवारपासून केएमटीचे पथक प्रत्येक प्रभागात फिरणार असून मास्क नसणाऱ्यांची थेट ५०० रुपयांची पावती फाडणार आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी स्वतंत्र २०० जणांची नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देमास्क घाला; अन्यथा ५०० रुपयांची पावतीप्रत्येक प्रभागात केएमटीचे पथक : आजपासून कारवाई सुरू

कोल्हापूर : मास्क घालत नसणाऱ्यांनी आता सावध राहावे; कारण आज, बुधवारपासून केएमटीचे पथक प्रत्येक प्रभागात फिरणार असून मास्क नसणाऱ्यांची थेट ५०० रुपयांची पावती फाडणार आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी स्वतंत्र २०० जणांची नियुक्ती केली आहे.अन‌्लॉकमुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घरातून बाहेर पडताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे. विनामास्क कोणी आढळल्यास दंडात्मक कारवाई सुरू आहे. आज, बुधवारपासून कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे.

महापालिकेकडून केएमटीच्या २०० चालक, वाहकांना दंडवसुलीचे अधिकार दिले असून त्यांचे पथक तयार केले आहे. मंगळवारी पथकाला प्रशिक्षण देण्यात आले. एक चालक, एक वाहक अशी ८१ प्रभागांसाठी १६२ जणांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पावती पुस्तकासह कारवाईचे अधिकारपत्रही दिले आहे.

शहरातील ८१ प्रभागांसह गर्दी होणारी १० ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणी कारवाईसाठी विशेष ३८ जणांचे पथक आहे. चार कर्मचारी गर्दीच्या ठिकाणी दिवसभर तळ ठोकून असणार आहेत. मास्क नसणाऱ्यांवर तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नसणाऱ्यांकडून ते दंड वसूल करणार आहेत.- चेतन कोंडे, साहाय्यक आयुक्त, महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBus DriverबसचालकMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर