शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -वीज कर्मचाऱ्यांनी बजावली ‘जनता कर्फ्यू’त ही सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:31 IST

जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे नागरिकांना घरात थांबविण्यासाठी वीजपुरवठा अखंडित ठेवणे महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘महावितरण’च्या प्रशासनाला अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.

ठळक मुद्देवीज कर्मचाऱ्यांनी बजावली ‘जनता कर्फ्यू’त ही सेवाशाहूपुरीतील वीजपुरवठा पूर्ववत

कोल्हापूर : जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे नागरिकांना घरात थांबविण्यासाठी वीजपुरवठा अखंडित ठेवणे महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘महावितरण’च्या प्रशासनाला अखंडित वीजपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वीज कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली.‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता, उपअभियंता, वायरमन यांच्यासह फिल्डवरील कर्मचारी कार्यरत होते. जनता कर्फ्यूच्या काळात वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी रस्त्यावर उतरून वीज कर्मचाऱ्यांनी आपली कामगिरी चोख बजावली. त्यामुळे नागरिकांना घरातील सुखसुविधांचा वापर करता आला.

सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडमध्ये राहून ओळखपत्र ठेवण्यासह स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सर्वांनी त्याचे पालन केल्याचे दिसून आले. कर्फ्यूकाळात अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या विभागांसाठी टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आल्या. त्यामध्ये दिवसरात्र अखंडित वीजपुरवठा ठेवण्यासाठी झटणाऱ्या वीज कर्मचाऱ्यासाठीही टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.शाहूपुरीतील वीजपुरवठा पूर्ववतशनिवारी रात्री शाहूपुरी ११ केव्ही फीडरवरील जदुबन प्लाझाशेजारील ‘एचटी’ फोरवेमधील आऊटगोइंग केबल शॉर्ट झाली. त्यामुळे या केबलवरील पुढील भाग बंद केल्याने ट्रान्सफॉर्मरवरील घरगुती, औद्योगिक, व्यापारी असे ग्राहक बंद राहिले.

रविवारी सकाळी सर्व लाईनलाईन स्टाफ आणि अधिकारी यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात करून ते पूर्ण केले. यानंतर वीजपुरवठा पूर्ववत झाला. यामध्ये साहाय्यक अभियंता सचिन पाटील, मोहसीन किणीकर, मुख्य तंत्रज्ञ अनिल काजवे, प्रधान तंत्रज्ञ मनोज बगणे, तंत्रज्ञ राहुल नलवडे, रमेश एकशिंगे, तंत्रज्ञ मारुती गेडाम, शशांक नागदेवे, राजेश कदम, आदी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर