कोल्हापूर : गृहअलगीकरणाचा शिक्का असतानाही व्यवसाय करणाऱ्या प्रभाग क्रमांक ८० मधील एका व्यक्तीस सोमवारी महापालिकेच्या विशेष पथकाने ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.महापालिका प्रभाग क्रमांक ८० येथे गृहअलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीने गिरण चालू केल्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई अधिक गतीने राबविली जाईल, असेही आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्पष्ट केले.गृहअलगीकरण आणि विलगीकरणातील व्यक्ती हमीपत्रातील अटींचे उल्लंघन करून बाहेर फिरत, व्यवसाय करत असलेच्या नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्याने विशेष पथकाने याकामी अधिक लक्ष द्यावे, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या.
corona virus : क्वारंटाईन असताना व्यवसाय करणाऱ्यास ५ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 19:01 IST
गृहअलगीकरणाचा शिक्का असतानाही व्यवसाय करणाऱ्या प्रभाग क्रमांक ८० मधील एका व्यक्तीस सोमवारी महापालिकेच्या विशेष पथकाने ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
corona virus : क्वारंटाईन असताना व्यवसाय करणाऱ्यास ५ हजारांचा दंड
ठळक मुद्देगृहअलगीकरणाचा शिक्का असतानाही व्यवसाय विशेष पथकाने वसूल केला ५ हजार रुपयांचा दंड