शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

corona virus : कोविड सेंटरमध्ये रंगला बारशाचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:29 IST

पॉझिटिव्ह-निगेटिव्हची धाकधुक, आरोग्याची काळजी, कुटुंबीयांची चिंता असे एरवी कोविड सेंटरमधील चित्र असते. बुधवारी मात्र व्हाईट आर्मींच्या कोविड सेंटरमध्ये फुलांची सजावट होती, सगळीकडे उत्साह होता. पाळण्याची गाणी रंगली, व्हाईट आर्मीच्या तत्परतेमुळे कोरोनामुक्त झालेल्या या मातेच्या बाळाचे नाव ठेवले शुभ्रसेना आणि लाडाचे नाव शुभ्रा. बारशानंतर या मायलेकीला प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील घरी सुखरूप पोहोचवण्यात आले.

ठळक मुद्देकोविड सेंटरमध्ये रंगला बारशाचा सोहळा व्हाईट आर्मीचा पुढाकार : कोरोनामुक्त माय लेकीला निरोप

कोल्हापूर : पॉझिटिव्ह-निगेटिव्हची धाकधुक, आरोग्याची काळजी, कुटुंबीयांची चिंता असे एरवी कोविड सेंटरमधील चित्र असते. बुधवारी मात्र व्हाईट आर्मींच्या कोविड सेंटरमध्ये फुलांची सजावट होती, सगळीकडे उत्साह होता. पाळण्याची गाणी रंगली, व्हाईट आर्मीच्या तत्परतेमुळे कोरोनामुक्त झालेल्या या मातेच्या बाळाचे नाव ठेवले शुभ्रसेना आणि लाडाचे नाव शुभ्रा. बारशानंतर या मायलेकीला प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील घरी सुखरूप पोहोचवण्यात आले.मुंबईला राहत असलेल्या अमृता सचिन गुरव या बाळंतपणासाठी मुंबईहून कोल्हापुरात प्रयाग चिखली येथे आल्या. ३ तारखेला त्यांना प्रसवकळा सुरू झाल्यानंतर दवाखान्यात नेण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयाने उपचारास नकार दिला. अखेर एका सेवाभावी डॉक्टरांनी त्यांची प्रसूती केली.

रात्री एक वाजता गोड मुलगी जन्माला आली; पण आई पॉझिटिव्ह असल्याने त्याच दिवशी त्यांना व्हाईट आर्मीच्या दिगंबर जैन बोर्डिंग येथील कोविड केंद्रात दाखल करण्यात आले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे डॉ. आबाजी शिर्के व डॉ. अमोल कोडोलीकर यांनी केलेल्या १३ दिवसांच्या उपचारांनंतर त्या ठणठणीत बऱ्या झाल्या.कोरोनामुक्त झालेल्या या मातेच्या बाळाचे नामकरण करूनच त्यांना निरोप देण्यात आला. बुधवारी दुपारी चार वाजता सेंटरमधून कोरोनामुक्त होऊन गेलेल्या महिलांच्या, कर्मचाऱ्यांच्या व नातेवाइकांच्या तसेच अशोक रोकडे यांच्या उपस्थितीत हा बारशाचा सोहळा रंगला. यानिमित्त परिसरात सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. सेंटरला फुलांची सजावट करण्यात आली. गोडधोडाचे जेवण झाले. बारशासह कराओकेवर गाणी रंगली. यानंतर सायंकाळी मायलेकीला सुरक्षितपणे प्रयाग चिखली येथील घरी पोहोचविण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाkolhapurकोल्हापूर