शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - खरेदीवर कोरोनाचे सावट, साखरेच्या माळा, चिव्याच्या काठीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 13:22 IST

भारतीय पंचांगानुसार नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांनी साखरेच्या माळा व चिव्याच्या काठीची खरेदी केली. मात्र यंदा मुहूर्ताच्या खरेदीवर कोरोनाचे सावट असणार आहे.

ठळक मुद्देसाखरेच्या माळा, चिव्याच्या काठीची खरेदी-तयारी गुढीपाडव्याची : मुहूर्ताच्या खरेदीवर कोरोनाचे सावट

कोल्हापूर : भारतीय पंचांगानुसार नववर्षाचा पहिला दिवस असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांनी साखरेच्या माळा व चिव्याच्या काठीची खरेदी केली. मात्र यंदा मुहूर्ताच्या खरेदीवर कोरोनाचे सावट असणार आहे.हिंदू पंचांगानुसार चैत्राचा पहिला दिवस असलेला गुढीपाडवा हा सण उद्या, बुधवारी साजरा केला जात आहे. हा नवीन वर्षारंभ असल्याने घरांवर गुढी उभारली जाते. पुरणपोळीसह पक्वान्नांचा नैवेद्य केला जातो. हा दिवस वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त असल्याने या दिवशी खरेदी केल्यास कुटुंबात समृद्धी नांदते अशी श्रद्धा आहे.मात्र, यंदा या सणाच्या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. शहरं लॉकडाऊन केली जात आहेत, नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जावू नये, असे आवाहन केले जात आहे. रविवारच्या बंदनंतर सोमवारी नागरिकांनी साहित्यांच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. या काळात गुढी उभारली जाते त्या चिव्याची काठी व साखरेच्या माळांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली.

चिव्याच्या काठीचा दर ५० रुपयांपासूनच १५० ते १८० रुपयांपर्यंत आहे. तर साखरेच्या माळा १० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत आकारमानानुसार आहेत. शहरातील लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, टिंबर मार्केट, मिरजकर तिकटी, राजारामपुरी, महाद्वार रोड, खरी कॉर्नर यासह उपनगरांमध्ये चौकाचौकात चिव्याच्या काठ्या मांडण्यात आल्या आहेत.

सध्या सर्वत्र बंदचे वातावरण असल्याने साखरेच्या माळा विक्रेते ग्राहकांना गाडीसमोर अथवा दुकानासमोर गर्दी करू नका, असे आवाहन करीत आहेत. पटापट साहित्यांची विक्री करून माल संपवण्यावर त्यांचा भर आहे.कोरोनाच्या धास्तीमुळे सध्या मुहूर्ताच्या खरेदीपूर्वी साहित्यांची केली जाणारी चौकशीही कमी झाली आहे. या दिवशी सोने, चांदीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, होम अप्लायन्सेस, सायकली, दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी केली जाते. मात्र सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. सरकारकडून रोज नवनवे आदेश येत आहेत. त्यामुळे सणाच्या दिवसापर्यंत मुहूर्ताच्या उलाढालीचा नेमका अंदाज व्यावसायिकांनाही येत नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgudhi padwaगुढीपाडवाkolhapurकोल्हापूर