शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus-प्रभाग समिती सचिवांवर राजकीय दबाव ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:41 IST

कोल्हापूर शहराच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. मात्र शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सचिव चांगले काम करीत असताना त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. विशेषत: हा हस्तक्षेप गृह अलगीकरणासंदर्भात असतो; त्यामुळे काही भागांतील सचिव या दबावाने त्रासले आहेत.

ठळक मुद्देप्रभाग समिती सचिवांवर राजकीय दबाव ?अनेक ठिकाणी चांगले काम

कोल्हापूर : शहराच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. मात्र शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महानगरपालिकेच्या प्रभाग समितीचे सचिव चांगले काम करीत असताना त्यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. विशेषत: हा हस्तक्षेप गृह अलगीकरणासंदर्भात असतो; त्यामुळे काही भागांतील सचिव या दबावाने त्रासले आहेत.कोरोना संसर्ग जेव्हा सुरू झाला, त्यानंतर एक महिन्याने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रभाग समित्या स्थापन केल्या. शहरात अशा ८१ समित्या असून तिचे अध्यक्ष हे संबंधित नगरसेवक; तर सचिव हे महापालिकेचे कर्मचारी आहेत. सचिवांनी प्रभागात बाहेरगावांहून कोण आले, त्यांची तपासणी झाली आहे की नाही, गृह अलगीकरणाचा सल्ला दिलेल्या व्यक्ती घरात थांबतात की नाही, प्रभागात लोक मास्क लावतात की नाही, यावर लक्ष ठेवायचे आहे. एवढेच नाही तर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर त्याच्या घरातील संपर्कातील व्यक्तींना रुग्णालयात पाठविणे अशी कामेही त्यांच्यावर सोपविली आहेत.स्वत:चा जीव धोक्यात घालून, ही एक संधी आहे असे समजून सर्वच सचिव चांगले काम करीत आहेत; परंतु काही प्रभागांत त्यांना राजकीय रोषाला तसेच दबावाला बळी पडावे लागत आहे. एखाद्याच्या घरात पुरेशा सुविधा नसतील तर सचिव जबाबदारी घेत नाहीत. त्यावेळी गृह अलगीकरणासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो. वास्तविक असे करणे म्हणजे शहरात कोरोनाला आमंत्रण देण्याचाच प्रकार आहे. काही सचिवांनी अशा दबावापोटी आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत, तर काहींनी या कामातून स्वत:ला कार्यमुक्त करून घेतले आहे. या सचिवांना आयुक्त कलशेट्टी यांनी दंड करण्याचे तसेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत; परंतु कारवाई करायला गेले की, लगेच दबाव येतो. त्यामुळे त्यांचे हात बांधले गेले आहेत.अनेक ठिकाणी चांगले कामकोरोनासारख्या महामारीच्या काळात हा राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव अयोग्य आहे. बऱ्याच नगरसेवकांनी नागरिकांना नियम पाळण्याची सक्तीही केल्याचे पाहायला मिळते. त्यांनी कसलाही हस्तक्षेप करण्याचे टाळले आहे. मात्र काही ठिकाणी चित्र वेगळे आहे. विशेषत: दाट वस्तीच्या तसेच झोपडपट्टीच्या प्रभागात हे घडत असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर