शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : परजिल्ह्यांतील कोरोना निगेटिव्ह लोकांनाच प्रवेश द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:28 IST

परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची ज्या-त्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधूनच स्रावतपासणी करून घ्यावी. ती निगेटिव्ह आली असेल तरच जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी द नेशन फर्स्ट, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनकडून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देपरजिल्ह्यांतील कोरोना निगेटिव्ह लोकांनाच प्रवेश द्यावाद नेशन फर्स्ट, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन यांची मागणी

कोल्हापूर : परजिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची ज्या-त्या जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधूनच स्रावतपासणी करून घ्यावी. ती निगेटिव्ह आली असेल तरच जिल्ह्यात प्रवेश द्यावा, अशी मागणी द नेशन फर्स्ट, वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशनकडून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे, पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेला कोल्हापूर जिल्ह्याला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते; परंतु अनलॉक १ मध्ये इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांचे फ्री टू ट्रॅव्हल सर्टिफिकेट घेऊन ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आणि नेमका इथेच घोळ झाला.आता कोल्हापूरकरांनी स्वतःहून अत्यंत कडक लॉकडाऊन पाळलेला आहे; पण समूह संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला असल्याने रुग्णसंख्या दिवसागणिक शेकडोंनी वाढत आहे, उपचारासाठी बेड कमी पडत आहेत.

खासगी हॉस्पिटल मात्र महागडे उपचार देत आहेत, जे सर्वसामान्य लोकांना न परवडणारे आहेत. त्यामुळे सर्व खासगी लॅबमधील स्राव तपासणीचे शुल्क या महामारीच्या काळात जास्तीत जास्त ५०० रुपये ठेवावे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वतःहून स्राव देता येईल व कोरोनाबाबत वेळीच दक्षता घेता येईल. ज्या ज्या रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिबा फुले योजना कार्यान्वित आहे, त्या रुग्णालयांना जादा चार्जेस न आकारता या योजनेतूनच रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक करावे.

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार बंधनकारक करून जास्तीत जास्त बिल आकारणीत मर्यादा ठेवावी. असे न केल्यास किंवा गैरप्रकार आढळल्यास तत्काळ त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा, अशी मागणी अवधूत भाट्ये यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर