शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : गडहिंग्लजच्या कोविड केंद्रात 'निगेटिव्ह' तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 19:16 IST

कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असतानाही येथील एका खाजगी दवाखान्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राच्या बाथरूममध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या कोविड केंद्रात तरुणाची आत्महत्याकोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह

गडहिंग्लज : कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असतानाही येथील एका खाजगी दवाखान्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्राच्या बाथरूममध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधीर दत्तात्रय येसरे ( ३५ रा. लिंगनूर कसबा नूल ता. गडहिंग्लज)असे त्याचे नाव आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (२२) ताप व थकवा आल्यामुळे दोन दिवसापूर्वी सुधीर हा येथील शेंद्री माळावरील कोवाड केंद्रात स्वतःहून तपासणीसाठी आला होता. त्याचा मोठा भाऊ यशवंत हादेखील त्याच्यासोबत होता.गुरूवारी (२३)सुधीर व यशवंत दोघांचेही स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होते. दरम्यान,कोविड केंद्राच्या जवळच असलेल्या एका खाजगी दवाखान्यातील समर्पित कोविड आरोग्य केंद्रात त्यांना ठेवण्यात आले होते.आज शुक्रवारी (२४) दुपारी सुधीर व यशवंत दोघांच्या कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला. दोघांनाही त्याची माहिती देण्यात आली होती. दुपारच्या जेवणानंतर बाथरूमला जाऊन येतो, असे सांगून तो बाथरूममध्ये गेला.

पॅन्ट व बनियनच्या सहाय्याने गळफास तयार करून बाथरूमच्या चौकटीला त्याने गळफास घेतला. बराच वेळ तो बाहेर न आल्यामुळे त्याचा भावाने आणि कर्मचाऱ्यांनी बाथरूममध्ये डोकावून पाहिले असता त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तो अविवाहित आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील व भाऊ असा परिवार आहे.घटनास्थळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन अथणी, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी भेट दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर