शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

corona virus : लॉकडाऊनमध्ये वीज दरवाढीचा झटका, बिलांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:26 IST

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उत्पन्न बुडाले. घरगुती खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये महावितरणने वीजदरवाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांचे बिल एकत्र दिले असून, एप्रिलपासून ही वाढ करण्यात आली आहे. वीज दरात केलेली वाढ, वाढलेले बिल पाहून ग्राहकांना धक्काच बसला आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊनमध्ये वीज दरवाढीचा झटका, बिलांमध्ये वाढग्राहकांकडून संतप्त प्रतिक्रिया : तीन महिन्यांचे एकत्र आलेल्या बिलात वाढ

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उत्पन्न बुडाले. घरगुती खर्च भागवणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये महावितरणने वीजदरवाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांचे बिल एकत्र दिले असून, एप्रिलपासून ही वाढ करण्यात आली आहे. वीज दरात केलेली वाढ, वाढलेले बिल पाहून ग्राहकांना धक्काच बसला आहे.महावितरणकडून कोरोनामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांचे मीटर तपासणी केली नाही. आता लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे तपासणी केली असून बिल वाटप केले जात आहे. तीन महिन्यांचे बिल एकत्र आले आहे. महिन्याला तीनशे रुपये बिल येणाऱ्यांना तीन महिन्यांचे दोन हजार बिल आले आहे. सरासरी बिल आकारणी केली जात असली तरी एप्रिलमध्ये वाढलेले वीज दरही बिल वाढीस कारण आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत दरवाढ केल्यामुळे ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.वहन आकार दुपटीने वाढलावहन आकार वापर केलेल्या युनिटवर आकारला जातो. युनिटचे दर वाढल्यामुळे वहन आकारही वाढला आहे. ११० रुपये वहन आकार येणाऱ्या ग्राहकास तीन महिन्यांच्या बिलात ६९० रुपये आला आहे. यामुळे बिलात वाढ दिसून येत आहे.तीन महिन्यांचे बिल वाढण्याची प्रमुख कारणेयुनिट दरात वाढ, मार्च ते मे महिने उन्हाळ्याचे असल्याने वीज वापरात वाढ, लॉकडाऊनमुळे घरीच नागरिक असल्याने टीव्ही, मोबाईल, आदी वीज उपकरणांचा नेहमीपेक्षा जास्त वापर.पुढील महिन्यांत बिल कमी येणारपावसाळा सुरू झाल्याने फॅन, एसीचा कमी वापर होतो. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे व्यवसाय अथवा नोकरदार कामानिमित्त बाहेर जात आहेत. त्यामुळे पुढील बिल कमी येण्याची शक्यता आहे.घरगुतीसाठीचे वाढलेले वीजदरयुनिट                   पूर्वीचा दर          सध्याचा दर         वाढ

  • ० ते १००                  ३.०५ पैसे              ३.४३ पैसे         ४० पैसे
  • १०१ ते ३००              ६.९५ पैसे             ७.४३ पैसे         ४७ पैसे
  • ३०१ ते ५००              ९.९० पैसे             १०.३२ पैसे       ०.४२ पैसे
  • ५०१ ते १०००          ११.५० पैसे            ११.७१ पैसे       २१ पैसे
टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर