शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

corona virus : इचलकरंजीत आयजीएम रूग्णालयातही लिक्वीड ऑक्सिजनचा टँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:44 IST

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात 6 हजार लीटरचा लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. दिवसाला 200 हून अधिक रूग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून शनिवारपर्यंत हा टँक कार्यान्वित होणार आहे.

ठळक मुद्दे इचलकरंजीत आयजीएम रूग्णालयातही लिक्वीड ऑक्सिजनचा टँकशनिवारपर्यंत टँक कार्यान्वित होणार

कोल्हापूर : येथील सीपीआर रूग्णालयातील 20 हजार लीटर लिक्वीड ऑक्सिजन टँकनंतर काल इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रूग्णालयात 6 हजार लीटरचा लिक्वीड ऑक्सिजन टँक बसवण्यात आला आहे. दिवसाला 200 हून अधिक रूग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून शनिवारपर्यंत हा टँक कार्यान्वित होणार आहे.कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेवून जिल्हा नियोजन समितीमधून सीपीआरसाठी 20 हजार लिटरच्या तसेच इचलकरंजी येथील आयजीएमसाठी 6 हजार लिटर लिक्विड ऑक्सिजन टँक व तद्अनुषंगे कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला व त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करण्यात आले.17 फूट उंच, 2 फूट व्यास असलेला हा लिक्विड ऑक्सिजन टँक काल बसविण्यात आला. यासोबतच 200 क्युबिक मीटर प्रती तास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. 6 हजार लीटर क्षमतेचा हा टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून आयजीएम रूग्णालयात असणाऱ्या ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल.

तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजनची सुविधा देण्यात येत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा टँक बसविण्यात आला.या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने हे नियंत्रण अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा टँक बसविण्यासाठी कोल्हापूर ऑक्सिजन लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाढवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, उपअभियंता बी.एल.हजारे, शाखा अभियंता सतीश शिंदे, बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे, विनोद खोंद्रे यांचे पथक कार्यरत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याichalkaranji-acइचलकरंजीhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर