शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर होम कोरोंटाईन'चे शिक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:56 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले ) येथील टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारे पुण्या-मुंबईकडील  वाहने अडविण्यात आली होती. यामधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून होम कोरोंटाईन'चे शिक्के मारून सोडण्यात येते होते. महामार्गावर वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. 

ठळक मुद्देजिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर होम कोरोंटाईन'चे शिक्केकिणीचा टोलनाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी

किणी/कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस व प्रशासनाने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी (ता. हातकंणगले ) येथील टोल नाक्यावर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणारे पुण्या-मुंबईकडील  वाहने अडविण्यात आली होती. यामधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून होम कोरोंटाईन'चे शिक्के मारून सोडण्यात येते होते. महामार्गावर वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. सोमवारी  लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतर  महामार्गावर वाहनधारकांची संख्या वाढत असल्याने  जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी दहा वाजलेपासून जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली  सकाळी दहा  जिल्ह्यात  प्रवेश करणारी सर्व वाहनधारकांना बॅरॅकेटस लावुन अडविण्यात आली.यामध्ये मोटरसायकल, कार, जीप, खासगी  प्रवाशी वाहनांसह माल वाहतुक करणाऱ्या वाहनधारकांचा समावेश होता. या वाहनांच्या रांगा लांबच्या लांब लागल्या होत्या. या वाहनधारकांना सुचना देऊन टोल नाक्या शेजारी उभारलेल्या  आरोग्य विभागाच्या तपासणी केंद्रावर थांबवून त्यातील प्रवाशांना भादोले आरोग्य केंद्रांतर्गत वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमोल नरदे, डॉ. ऐश्वर्या सिद, वर्षा पाटील, निमा तडवी यांचेसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे तपासणी केली जात होती.

 त्यानंतर आलेल्या सर्व प्रवाशांच्या हातावर 'होम कोरोंटाईन' चे शिक्के मारून त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देऊन सोडण्यात येत होते. तपासणी करुनच जाण्यासाठी पोलिस सर्व खबरदारी घेत होते. यावेळी वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदिप काळे, सीताराम डुबल, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशानदार आदी बंदोबस्तासाठी तैनात होते. दरम्यान, निवास मार्ग सुरु आहे पण कागल - गारगोटी मार्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बिद्री येथे बंद करण्यात आला आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर