शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - एका दिवसात दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 14:02 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या घर ते घर सर्वेक्षणात गुरुवारी २०८१ घरांचे सर्वेक्षण करून १० हजार २७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देएका दिवसात दहा हजार नागरिकांची आरोग्य तपासणीघर ते घर सर्वेक्षणात २०८१ घरांचे सर्वेक्षण

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या घर ते घर सर्वेक्षणात गुरुवारी २०८१ घरांचे सर्वेक्षण करून १० हजार २७८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.देशभरात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला लागल्यामुळे खरबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने दि. १८ मार्च पासून घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. तातडीने त्याची अंमलबजावणीही सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत ३१ हजार ६२३ घरांत महापालिकेचे कर्मचारी पोहोचले असून, एक लाख २२ हजार ८८९ लोकांच्या आरोग्याची तपासणी केली.या सर्वेक्षणात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे नोंदी करून घेतल्या आहेत. घरातील व्यक्ती, त्यांचे देश आणि परदेशात झालेले प्रवास, त्यांच्यापैकी कोणाला सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आहेत का, याची सगळी माहिती नोंदवण्यात येत आहे.१५ फेब्रुवारी नंतर परदेशवारी तसेच देशांतर्गत प्रवास केलेल्या व्यक्तींची नोंद वेगळी ठेवली आहे. या सर्वेक्षणात १५ फेब्रुवारीनंतर परदेशवारी केलेले ९१ नागरिक मिळून आले. त्यांच्यापैकी सर्दी, ताप, खोकला, इत्यादी लक्षणे आढळून आलेली एकच व्यक्ती आढळली. तसेच या सर्व्हेमधील तपासणीकरिता पाठविण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या २८ इतकी असून, त्यांनाही कसली बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत हे सर्वेक्षण व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर