शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

corona virus : कोरोना संसर्गाचा मोठा दिलासा, १३३ नवीन रुग्ण, ८ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:33 IST

corona virus, kolhapur news कोरोना संसर्गाचा गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यास सोमवारी प्रथमच मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासांत नवीन कोरोना रुग्णात लक्षणीय घट झालीच शिवाय एका दिवसात सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाचा मोठा दिलासा १३३ नवीन रुग्ण, ८ रुग्णांचा मृत्यू ,९०५ कोरोनामुक्त

कोल्हापूर : जिल्ह्याचे आरोग्य बिघडवून टाकलेल्या कोरोना संसर्गाचा गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यास सोमवारी प्रथमच मोठा दिलासा मिळाला. गेल्या चोवीस तासांत नवीन कोरोना रुग्णात लक्षणीय घट झालीच शिवाय एका दिवसात सर्वाधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच मृत्यू होणाऱ्यांची संख्याही एकदम कमी झाली. कोरोनाची परिस्थिती सुधारण्याची हीच गती राहिली तर पुढील आठ दहा दिवसांत कोल्हापूरचे चित्र पूर्णपणे बदललेले असेल.सोमवारी जिल्ह्यात विविध भागात नवीन १३३ रुग्णांची नोंद झाली, तर आठ रुग्ण उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर तब्बल ९०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सौम्य लक्षणे असलेले ५७५७ रुग्ण त्यांच्या घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याने जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आता कोरोनाचे केवळ १९६६ रुग्ण दाखल आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात असून, रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. रोज हजार-बाराशे रुग्ण आढळून येत होते. ही संख्या काही दिवसांपासून २०० ते २५० इतक्या संख्येपर्यंत खाली आली होती. सोमवारी तर केवळ १३३ रुग्ण आढळून आले. रोज ३० ते ३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू व्हायचा तोही आता बारा-पंधरांपर्यंत खाली आला होता. सोमवारी तर आठ रुग्ण दगावले.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ हजार ७२८ इतकी झाली असून, मृतांची संख्या १४९७ इतकी झाली आहे. आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी की, आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३६ हजार ५०८ वर गेली आहे. नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे स्राव घेणे, चाचण्या यांची संख्याही लक्षणीय कमी झाली आहे. त्यामुळे एकूणच प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.सर्वच तालुक्यांत १० च्या आत रुग्ण-सोमवारी कोल्हापूर शहरात ३८ रुग्ण आढळले; मात्र सर्वच तालुक्यात १० च्या आतच रुग्ण आढळून आले, तर आजरा ३, चंदगड १०, गडहिंग्लज ८, गगनबावडा १, हातकणंगले १, कागल ९, करवीर ८, पन्हाळा ६, राधानगरी ४, शाहूवाडी ३, शिरोळ येथे दोन रुग्णांची नोंद झाली.तपासणी अहवाल -चाचणीचा प्रकार चाचणींची संख्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह१. आरटीपीसीआर २९५ ५७ २३१२. अँटिजेन २२८ १३ २१५३. खासगी लॅब २९६ ६३ २३३मृतांत कोल्हापूरचे तिघे गेल्या चोवीस तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापुरातील प्रतिभानगर, गंगावेश, महाद्वार रोड, तसेच आजऱ्यातील भादवणवाडी, हातकणंगलेतील गांधी चौक व हुपरी, शिरोळमधील मौजे आगर व इस्लामपूर येथील रुग्णांचा समावेश आहे.तालुकानिहाय रुग्ण -आजरा - ८०२, भुदरगड - ११३९, चंदगड - १०७५, गडहिंग्लज - १३०५, गगनबावडा - १३१, हातकणंगले - ४९९४, कागल - १५७५, करवीर - ५३११, पन्हाळा - १७६१, राधानगरी - ११८६, शाहूवाडी - १२१९, शिरोळ - २३५५, नगरपालिका हद्द - ७०२७, कोल्हापूर - १३,८८२, इतर जिल्हा - २००६.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर