शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनासाठी खासगी दवाखान्याना शासनाकडून औषध पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:24 IST

खासगी रूग्णालयांना कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जाईल, पण त्यांनी शासकीय नियमानुसार बेड आरक्षित ठेवून शासकीय दारानेच उपचार करावेत, अशी अट करू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घातली आहे.

ठळक मुद्देकोरोनासाठी खासगी दवाखान्याना शासनाकडून औषध पुरवठाजिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या सूचना, शासकीय दारानेच उपचार करण्याची अट

कोल्हापूर: खासगी रूग्णालयांना कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जाईल, पण त्यांनी शासकीय नियमानुसार बेड आरक्षित ठेवून शासकीय दारानेच उपचार करावेत, अशी अट करू जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घातली आहे.शहरातील खासगी रूग्णालयांच्या डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आपत्ती व्यवस्थापन समिती प्राधिकरण समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते. आमदार चंद्रकांत जाधव व्ही.सी.द्वारे सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी म्हणाले, उपचारासाठी रूग्णांना फिरायला लागणे हे जिल्ह्याच्या दृष्टीने योग्य नाही. सी.पी.आर. मध्ये खाटांची क्षमता वाढविण्यात येत आहेत. सध्याची वेळ वेगळी आहे. ती लक्षात घेवून सर्व रूग्णालयांनी शासनाच्या निर्देशानुसार बेड आरक्षित ठेवून रूग्णांवर उपचार करावेत.महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, खासगी रूग्णालयात उपचारासाठी आलेल्या रूग्णांला तात्काळ दाखल करून त्याच्यावर डॉक्टरने उपचार करणं हे अत्यंत महत्वाचे आहे. ही वेळ सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या काम करण्याची आहे. तक्रारी येवू नयेत यासाठी नियोजन आवश्यक आहे.दर आकारणीचे फलक लावावेतखासगी रूग्णालयांनी शासनाने घालून दिलेल्या दर आकारणीबाबतचे फलक लावावेत, अशी सूचना डॉ. कलशेट्टी व आमदार चंद्रकांत जाधव यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीmedicineऔषधंkolhapurकोल्हापूर