शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -बाबांनो तुम्हाला चांगले आरोग्य लाभो...ड्युटीवरील पोलिसांचे औक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 15:57 IST

‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ हे शब्द आहेत एका माउलीचे. ‘जनता कर्फ्यू’साठी गस्तीवर असणाऱ्या ‘आयबाईक’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करतेवेळी या महिलेने काढलेले हे उद्गार.

ठळक मुद्देबाबांनो, तुम्हाला चांगले आरोग्य लाभोदौलतनगरातील महिलेने केले ड्युटीवरील पोलिसांचे औक्षण

कोल्हापूर : ‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ हे शब्द आहेत एका माउलीचे. ‘जनता कर्फ्यू’साठी गस्तीवर असणाऱ्या ‘आयबाईक’ पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करतेवेळी या महिलेने काढलेले हे उद्गार. दौलतनगरातील तीन बत्ती चौक परिसरातील एका घरातील रविवारचे हे भावनिक चित्र. या मायेच्या ओलाव्याने पोलिसांनाही गदगदून आले.जनता कर्फ्यूसाठी आयबाईक पथकाचे प्रमुख संजय जाधव यांच्यासह किशोर धूम, गौरव चौगले, सुनील घुमई हे कर्मचारी गस्तीवर होते. हे पथक दौलत नगरातील तीन बत्ती चौक येथे गेल्यावर एका घरातून त्यांना बोलविण्यात आले. काही भांडण वैगेरे झाले आहे का? अशा समजुतीनेच पोलीस या घरी गेले. त्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

समोर एक माउली हातात आरतीचे ताट घेऊन औक्षणासाठी उभी होती. आक्काताई शामराव चव्हाण असे त्यांचे नाव आहे. ‘बाबांनो, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, तुम्हाला चांगले आरोग्य लाभो’ असे म्हणत त्यांनी या पोलिसांचे औक्षण केले.

अचानकपणे अशा पद्धतीने औक्षण झाल्याने पोलीसही गदगदून गेले. आम्ही कर्तव्यावर असताना त्याची दखल घेऊन या माउलीने केलेल्या ओवाळणीने आम्हाला समाधान वाटले, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर