शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनामुक्त रुग्णाला होम क्वारंटाईनसाठी दिला फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 18:15 IST

कोरोनामुक्त होऊन आलेल्या रुग्णाला अपार्टमेंटमध्ये रिकामा असलेला फ्लॅट होम क्वारंटाईनसाठी देऊन ब्रह्मेश्वर रेसिडेंसीकर यांनी आदर्श निर्माण केला.

ठळक मुद्देकोरोनामुक्त रुग्णाला होम क्वारंटाईनसाठी दिला फ्लॅटब्रह्मेश्वर रेसिडेंसीकरांचा कौतुकास्पद उपक्रम

कोल्हापूर : कोरोनामुक्त होऊन आलेल्या रुग्णाला अपार्टमेंटमध्ये रिकामा असलेला फ्लॅट होम क्वारंटाईनसाठी देऊन ब्रह्मेश्वर रेसिडेंसीकर यांनी आदर्श निर्माण केला.ब्रह्मेश्वर रेसिडेन्सी येथील एक तरुणाला आठ दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला. कोणतीही लक्षणे नसल्यामुळे त्याला शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर रीतसर अपार्टमेंट सील करण्यात आली.

कोरोनामुक्त झाल्यानंतर तो तरुण सोमवारी घरी परतल्यावर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी त्याचे स्वागत केले. केवळ स्वागत करून न थांबता एकाने त्याला आपला रिकामा फ्लॅट होम क्वारंटाईन होण्यासाठी दिला. सुरेश देसाई, गणेश घोडके, रोहीत साळोखे, उदय जाधव, मणिलाल शहा, डॉ. निलेश कादवेकर यांच्या पुढाकाराने आणि अन्य सर्व राहिवासीयांच्या सहकार्यानेच  ब्रह्मेश्वर रेसिडेंसीकर यांनी आदर्श निर्माण केला.

ब्रह्मेश्वर रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी कोरोनामुक्त रुग्णाचे स्वागत केले, ते पाहून सगळा परिसरच सद्गदित झाला.आज कोल्हापूरला एक अत्यंत सकारात्मक उदाहरण रहिवाशांनी दिले. सम्पूर्ण कोल्हापूर शहरातील अपार्टमेंट्सनी हा कित्ता गिरविणे ही काळाची गरज आहे. शेजारील पिनाक शिवालय अपार्टमेंटनेही तेथील मोकळे फ्लॅट, सोसायटीत दुर्दैवाने कुणाला क्वारान्टीन करायला लागला तर त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय करून प्रभागाची मान उंचावली आहे.

 -अजित ठाणेकर,नगरसेवक, कोल्हापूर 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर