शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या : ‘कोरोना’मुळे अर्थव्यवस्था ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 15:45 IST

जुलै-आॅगस्टमधील महापुरातून सावरतो न सावरतो तोच ‘कोरोना’मुळे पश्चिम महाराष्ट्रातील  अर्थव्यवस्था पुरती ठप्प झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस आहेत आणि वसुली सोडाच पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नसल्याने बॅँकांना वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बॅँकिंग क्षेत्रातून होत आहे.

ठळक मुद्देवसुलीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्या : ‘कोरोना’मुळे अर्थव्यवस्था ठप्पबॅँकांची रिझर्व्ह बॅँकेकडे मागणी

कोल्हापूर : जुलै-आॅगस्टमधील महापुरातून सावरतो न सावरतो तोच ‘कोरोना’मुळे पश्चिम महाराष्ट्रातील  अर्थव्यवस्था पुरती ठप्प झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस आहेत आणि वसुली सोडाच पण घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नसल्याने बॅँकांना वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बॅँकिंग क्षेत्रातून होत आहे.महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही शेती, उद्योग आणि बांधकाम क्षेत्रावर अवलंबून आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत या तिन्ही घटकांवर मोठा आघात झाल्याने अर्थव्यवस्था कमालीची मंदावली आहे. त्याचा थेट परिणाम बॅँकिंग क्षेत्रावर झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर जुलै-आॅगस्टमध्ये महापूर, अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामुळे साखर उद्योग अडचणीत आला. उद्योगांवर गेली वर्ष-दीड वर्षापासून मंदीची लाट आहे. बांधकाम व्यवसाय तर ‘रेरा’ कायद्यानंतर पुरता कोलमडून गेला आहे. त्यातून सावरून पुढे सरकत असतानाच ‘कोरोना’चे संकट उभे राहिले.शेती, उद्योग आणि बांधकाम व्यवसायावरच बॅँकांचे अर्थकारण सुरू असते. यावरच आघात झाल्याने बॅँकांही आर्थिक अरिष्टात सापडल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या नवीन धोरणानुसार बॅँकांची वर्षभर वसुलीचे नियोजन करणे अपेक्षित असले तरी आपल्याकडे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच वसुलीला गती येते. ‘कोरोना’मुळे अखंड मार्च महिना वसुलीविना गेला आहे. हे संकट आणखी किती दिवस राहणार याचा अंदाज नाही.

ठप्प झालेली अर्थव्यवस्था लवकर रूळावर येईल असे वाटत नाही. बॅँकांचे ग्राहक असणारी यंत्रणा पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे बहुतांशी बॅँकांचे ताळेबंद पत्रक बिघडणार आहे. यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करत कर्ज वसुलीसाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी बॅँकिंग क्षेत्रातून होत आहे.नवीन कर्जवाटपही ठप्पबॅँकांचे वसुलीबरोबर कर्जवाटपही ठप्प झाले आहे. मुद्रांक शुल्क कार्यालय बंद आहेत. ‘आरटीओ’ कार्यालय बंद असल्याने वाहन कर्जेही होत नाहीत.

‘कोरोना’मुळे बॅँकांची वसुली पूर्णपणे थांबली असून, अजून किती दिवस अर्थव्यवस्था ठप्प राहणार याचा अंदाज नाही. ही राष्ट्रीय आपत्ती असल्याने केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्वत:हून कर्ज वसुलीबाबत सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्याबाबत रिझर्व्ह बॅँकेला सूचना करावी.- महेश धर्माधिकारी,उपाध्यक्ष, जिल्हा नागरी बॅँक्स असोसिएशन 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर