शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सहा दिवसांच्या कर्फ्यूमुळे पुन्हा एकदा जनता रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:21 IST

कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे व्यापारी व उद्योजकांनी मिळून शहरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू उद्या, शुक्रवारपासून पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अक्षरश: हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, कपिलतीर्थ, शिवाजी चौक, पापाची तिकटी, महापालिका परिसर आदी ठिकाणी झुंबड उडाली होती.

ठळक मुद्देसहा दिवसांच्या कर्फ्यूमुळे पुन्हा एकदा जनता रस्त्यावरजीवनावश्यक वस्तु खरेदीला वेग

 कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे व्यापारी व उद्योजकांनी मिळून शहरात सहा दिवसांचा जनता कर्फ्यू उद्या, शुक्रवारपासून पुकारला आहे. त्यामुळे बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अक्षरश: हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, कपिलतीर्थ, शिवाजी चौक, पापाची तिकटी, महापालिका परिसर आदी ठिकाणी झुंबड उडाली होती.बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे दिवसाकाठी सातशे ते हजार जणांना कोरोनाची लागण होत आहे. वाढत्या कोरोनाच्या कहरामुळे रुग्णालयेही हाऊसफुल्ल झाली आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व उद्योजकांनी सोमवारी (दि.८) कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनमध्ये बैठक झाली. या बैठकीत ११ ते १६ सप्टेंबर या सहा दिवसांच्या कालावधीत जनता कर्फ्यू पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हे सहा दिवस सुखकारक जावेत.

या उद्देशाने बुधवारी सकाळपासून लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजारपेठेमध्ये कडधान्ये, तांदुळ, गहू, तर किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अक्षरश: हा परिसर जत्रा फुलते त्याप्रमाणे बहरलेला होता. तर राजारामपुरी, शाहूपुरी येथेही व्यापाऱ्यांकडे किरकोळ दुकानदारांची खरेदीसाठी गर्दी झाली होती.

भाजी खरेदीसाठीही सर्वत्र गर्दीच गर्दी होती. अनेकांनी वारंवार खरेदीसाठी यावे लागू नये म्हणून पंचवीस ते पन्नास किलोच्या पटीत खरेदी केली. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे साहजिकच छोट्या हात्तीसारख्या टेम्पोची गरज लागली. त्यामुळे अशी वाहनेच वाहने बाजारपेठेत होती.

बाजारगेट, कपिलतीर्थ, भाऊसिंगजी रोड, शाहूपुरी आदी ठिकाणी असलेल्या तेल व्यापाऱ्यांकडेही तेलाची घाऊक व किरकोळ खरेदीसाठी गर्दी झाली होती.शहरातील मॉल्समध्येही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणीही रांगा व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केले जात होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर