शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : दिव्यांगांचा अवलिया जितेंद्र शिंदे, चार महिने भाजीपाला, औषधे मोफत घरपोहोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:16 IST

कोल्हापुरातील जितेंद्र शिंदे हे रिक्षाचालक गेले चार महिने शहरासह परिसरातील दिव्यांग व गरोदर महिलांना औषधे व भाजीपाला मोफत घरपोहोच करीत आहेत.

ठळक मुद्देदिव्यांगांचा अवलिया जितेंद्र शिंदे, चार महिने भाजीपाला, औषधे मोफत घरपोहोचदिव्यांगांसह गरोदर महिलांना भाजीपाला, औषधे मोफत

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोरोनाच्या धास्तीखाली सारे जग घरात असताना कोल्हापुरातील जितेंद्र शिंदे हे रिक्षाचालक दिव्यांगांच्या मदतीला धावून आले आहेत. गेले चार महिने शहरासह परिसरातील दिव्यांग व गरोदर महिलांना औषधे व भाजीपाला मोफत घरपोहोच करीत आहेत.

आतापर्यंत त्यांनी सुमारे ९५० व्यक्तींना अशा प्रकारची मदत केली आहे. मी आणि माझे कुटुंब या मोहजालात अडकलेल्या युगात पदरमोड करून इतरांसाठी धावून जाणारे शिंदे यांच्यासारखे ह्यअवलियाह्ण निश्चितच प्रेरणादायी आहेत.कोरोनामुळे गेले चार महिने सगळी अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. व्यवसाय बंद असल्याने अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात हे संकट कधी जाणार, हे निश्चित माहीत नसल्याने सगळीकडे अस्वस्थता आहे. अशा वातावरणात दिव्यांगांसह समाजातील सामान्य घटकाचे मोठे हाल होत आहेत.

या घटकांना अनेकांनी मदतीचे हात दिले असतील; मात्र गेले चार महिने त्यांना औषधे, भाजीपाला नित्यनियमाने पोेहोच करण्याचे काम टाकाळा, राजारामपुरी येथील जितेंद्र शिंदे यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केवळ माणुसकीच्या भावनेतून ते दिव्यांग, गरोदर महिला यांना कोणताही मोबदला न घेता औषधे व भाजीपाला घरपोहोच करीत आहेत.शिंदे यांच्या आई-वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने त्यांनी हॉटेलमध्ये काम करून, तिथेच राहून वाटचाल केली. ३० वर्षांपूर्वी रिक्षा घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र, गोरगरिबांविषयीची कणव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळेच रस्त्यावर एखादा अपघात झाला तर त्याला तत्काळ रुग्णालयात पोहोचवणे, पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढणे यासाठी ते स्वत:हून ते पुढे असतात.लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे मुश्कील होते. अशा काळात दिव्यांग व सामान्य कुटुंबातील गरोदर महिलांचे मोठे हाल झाले. त्यांना घरपोहोच औषधे व भाजीपाला पोहोच करण्याचा संकल्प शिंदे यांनी केला आणि गेले चार महिने ते अविरतपणे हे काम विनामोबदला करीत आहेत. फोन आला की कपिलतीर्थ मार्केट, गंगावेश यांसह शहरातील कोणत्याही मंडईत संबंधित व्यक्तीचे खाते आहे, त्यावर भाजीपाला घेऊन तो घरपोहोच केला जातो.शहरातून रिक्षा फिरवत असताना रस्त्यात कोणी भिकारी दिसला तर पैसे न देता हॉटेलमध्ये नेऊन त्याला पोटभर खायला द्यायचे. शासनाने सुरू केलेली ह्यशिवभोजनह्ण थाळी विकत घेऊन त्यांचेही वाटप शिंदे करतात.

लहानपणापासून गरिबीचे चटके सोसल्याने अशा संकटाच्या काळात गरजूंना मदत करणे हीच मानवता आहे. म्हणून गेली चार महिने पदरमोड करून हे मदतीचे काम करीत आहे.- जितेंद्र शिंदे ,टाकाळा, राजारामपुरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरDivyangदिव्यांग