शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : न्यायालयाचे कामकाज पुन्हा फक्त सकाळच्या सत्रातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:19 IST

न्यायसंकुलासह, न्यायनगरीत कोरोनाने शिरकाव केल्याने आता त्याचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. काही न्यायाधीश, कर्मचारी, वकीलवर्गासह कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे न्यायालयीन अडचणी वाढू शकतात. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज सकाळी १० ते दुपारी १ या एका सत्रातच सुरू झाले आहे.

ठळक मुद्देफक्त अतितत्काळ खटल्यांचे कामकाज चालणारकोरोनाचे भेदली न्यायव्यवस्था; व्हिडिओ कॉन्फरन्सवर भर

कोल्हापूर : न्यायसंकुलासह, न्यायनगरीत कोरोनाने शिरकाव केल्याने आता त्याचा न्यायालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. काही न्यायाधीश, कर्मचारी, वकीलवर्गासह कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे न्यायालयीन अडचणी वाढू शकतात. त्यामुळे न्यायालयाचे कामकाज सकाळी १० ते दुपारी १ या एका सत्रातच सुरू झाले आहे.

त्यामध्येही फक्त अतितत्काळ खटल्यांचे कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळे वकील, पक्षकारांनी स्वत:ची काळजी घेत न्यायालयात येण्याचे शक्यतो टाळावे, असे आवाहन जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजित गावडे यांनी केले आहे.न्यायसंकुलात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली होती. गेले दोन महिने लॉकडाऊन परिस्थितीत फक्त सकाळच्या सत्रातच तेही अत्यावश्यक खटल्याचेच कामकाज सुरू होते, त्यासाठी सरसकट वकील व पक्षकारांना न्यायालयात प्रवेश नाकारला जात होता.

अत्यावश्यक खटल्यांचे कामकाज चालविणाऱ्या वकिलांनाही तपासणीअंतीच प्रवेश मिळत होता पण तरीही न्यायसंकुलात कोरोनाचा शिरकाव झालाच. त्यामुळे गेले पंधरा दिवस सुरू केलेले दोन सत्रांतील न्यायालयाचे कामकाज बुधवारपासून फक्त सकाळच्या सत्रातच चालणार आहे.सकाळच्या सत्रात चालणाऱ्या कामकाजासाठी कनिष्ठ स्तर, वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या तीन न्यायमूर्तीसमोरच अतितत्काळ खटल्यांचे कामकाज चालणार आहे.काही न्यायाधीश, त्यांची कुटुंबीय, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, वकीलवर्ग यांनाच मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाल्याने त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी अत्यावश्यक खटल्यांच्या कामाशिवाय न्यायालयात वकील अगर पक्षकारांनी न्यायालयात तूर्त जाऊ नये, स्वता:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.संशयित आरोपींना व्हीसीद्वारेच हजरसकाळच्या सत्रात जरी अतितत्काळ खटल्यांचे फक्त कामकाज चालणार असले तरी त्यापैकी बहुतांशी कामकाज थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारेच चालणार आहे. त्यामध्ये विशेषत: अटकेतील संशयित आरोपींना कोठडी देण्याबाबतचे कामकाज असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयkolhapurकोल्हापूर