शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus - रिक्षांवर लावलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 14:04 IST

कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूंशी लढायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने आधी या विषाणूची माहिती करून घेतली पाहिजे म्हणून महापालिका प्रशासनाने जनजागृतीवर विशेष जोर दिला आहे. त्याकरिता प्रत्येक विभागीय कार्यालयास तीन याप्रमाणे बारा रिक्षा व त्यावर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे कोरानाबाबत शहरात जनजागृती करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरिक्षांवर लावलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृतीमहापालिका प्रशासनाने घेतली कोरोनाची धास्ती

कोल्हापूर : कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूंशी लढायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने आधी या विषाणूची माहिती करून घेतली पाहिजे म्हणून महापालिका प्रशासनाने जनजागृतीवर विशेष जोर दिला आहे. त्याकरिता प्रत्येक विभागीय कार्यालयास तीन याप्रमाणे बारा रिक्षा व त्यावर लावण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकाद्वारे कोरानाबाबत शहरात जनजागृती करण्यात येत आहे.जगभरात कोरोनाने थैमान घातले असून हजारो लोकांचा बळी गेला आहे. या जीवघेण्या आजाराच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकास्तरावर विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणखी काय उपाययोजना करता येतील यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.या बैठकीत रिक्षांद्वारे जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आणि लागलीच त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. आरोग्य विभागाच्यावतीने रविवारपासून शहरात चार ट्रॅक्टरद्वारे मध्यवर्ती बसस्थानक , रेल्वेस्थानक, भाजी मंडई, शासकीय कार्यालय या ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे, असे आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.शहरातील लक्ष्मीपुरी परिसर, संभाजीनगर वारे वसाहत परिसर, फुलेवाडी फायर स्टेशन, तुळजाभवानी परिसर या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आली. आरोग्य निरीक्षकांनी आपल्या विभागात जे नागरिक बाहेरगावाहून आले आहेत तसेच त्यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या घरातील कचरा इतर कचऱ्यांत मिक्स न करता स्वतंत्र गोळा करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

यासाठी प्रत्येक आरोग्य निरीक्षकांना प्रत्येकी एक किलो बायोमेडिकल वेस्टच्या पिशव्या स्वतंत्र कचरा गोळा करण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी सांगितले.सर्व प्रभागांतील सफाई कर्मचाऱ्यांना दोन हजार मास्क व हॅन्डग्लोज उपलब्ध करून दिले असून ते नियमितपणे घालण्याच्या सक्त सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त अवधूत कुंभार, चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले उपस्थित होते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर