शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

corona virus :लॉकडाऊनच्या धसक्याने अवघे शहर रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:50 IST

सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध, औषधांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जीवनावश्यक वस्तू मिळणार नसल्याने जणू अवघे शहर रविवारी किराणा वस्तू व धान्य, भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर अवतरले होते. त्यामुळे पाहाल तिकडे लोकांची तोबा गर्दी झाली होती. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, शिंगोशी,राजारामपुरी, आदी ठिकाणी किराणा,धान्य दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

ठळक मुद्देभाजी मंडई, किराणा दुकानांमध्ये रांगाच रांगा पेट्रोल पंपासह मद्य दुकानेही फुलली

कोल्हापूर : सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध, औषधांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जीवनावश्यक वस्तू मिळणार नसल्याने जणू अवघे शहर रविवारी किराणा वस्तू व धान्य, भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर अवतरले होते. त्यामुळे पाहाल तिकडे लोकांची तोबा गर्दी झाली होती. लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, शिंगोशी,राजारामपुरी, आदी ठिकाणी किराणा,धान्य दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती.कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात पुन्हा सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी १५ ते २० दिवस पुरतील इतक्या वस्तूंची खरेदी करून ठेवली. या खरेदीच्या बिगरहंगामी उत्सवामुळे जणू रस्त्यांवर गर्दीचा महापूर आल्यासारखी परिस्थिती रविवारी शहरवासीयांनी अनुभवली.या काळात दुकाने व भाजी मंडई आणि किराणा दुकाने बंद राहणार असल्याने रविवारी दुकानांमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यात आठवडा बाजाराचा दिवस असल्याने सकाळपासून शहरातील भाजी मंडईत ग्राहकांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र होते. मोकळ्या जागेत भाजीविक्रीमुळे वाहतुकीच्या कोंडीचे चित्र शहरातील प्रमुख चौकांत होते. शिवाजी रोड, मिरजकर तिकटी, आईसाहेब महाराज पुतळा चौक, माळकर तिकटी, गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, हत्तीमहाल रोड, लक्ष्मी रोड, बिंदू चौक, संभाजीनगर, नंगीवली चौक, शाहू बँक चौक, सावित्रीबाई फुले रुग्णालय चौक, उमा टॉकीज, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, राजारामपुरी मुख्य रस्ता, बागल चौक हे रस्ते एखाद्या सणाच्या खरेदीवेळी ज्याप्रमाणे गर्दी होते, त्याप्रमाणे फुलले होते. प्रत्येक दुचाकीवर स्वारासह मागे एक व्यक्ती पोते, पिशव्या धरून बसल्याचे चित्र दिवसभर होते. खरेदीच्या नावाखाली गर्दीचा हा महापूर रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.ही ठिकाणे कोरोनाची हॉटस्पॉट न ठरोतलक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, गंगावेश, महाद्वार रोड, गंगावेश, शिंगोशी मार्केट, रेल्वे फाटक, जुना बाजार (हत्तीमहाल रोड), महापालिका परिसर, आदी ठिकाणी खरेदीसाठी रांगा आणि कोणतेही सामाजिक अंतर न राखता ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. लॉकडाऊन आज, सोमवारपासून असे तरी रविवारच्या गर्दीमुळे अनेकांना कोरोनाची लागण न झाली म्हणजे मिळवले, अशी भयावह परिस्थिती या परिसरात होती.दळपासाठी गर्दीसात दिवसांच्या काळात घरामध्ये चपाती, भाकरी, बेसन, भाजणी या पिठांची कमतरता भासू नये याकरिता अनेकांनी दळप-कांडप गिरण्यांमध्ये रविवारी पहाटेपासून आपली दळप, कांडपे क्रमांकाला लावून ठेवली होती. एरवी या गिरण्यांमध्ये दोन-चार डब असतात. मात्र, रविवारी या गिरण्या अक्षरश: फुलून गेल्या होत्या. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर