शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -कोल्हापूर शहरात अनामिक भीती अन् बंदसदृश्य स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 19:01 IST

कोल्हापूर शहर परिसरात शुक्रवारी बंदसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी व्यवसाय सुरू असले तरी ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे. दुपारच्या सत्रात रस्ते ओस पडले होते.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात अनामिक भीती अन् बंदसदृश्य स्थितीखबरदारीची आणखी आवश्यकता

कोल्हापूर : कोरोना या जीवघेण्या विषाणूच्या प्रसाराबाबत महानगरपालिका, तसेच जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेली जनजागृती, प्रसार आणि प्रसिद्धी माध्यमातून मिळत असलेली भयावह माहिती यामुळे कोल्हापूर शहर परिसरात नागरिकांच्या मनात एक अनामिक धास्ती दिसून येत आहे.

शुक्रवारी संपूर्ण शहरात बंदसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी व्यवसाय सुरू असले तरी ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे. दुपारच्या सत्रात रस्ते ओस पडले होते.गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्याबाबत सुरू असलेली प्रतिबंधात्मक उपाययोजना पाहता महानगरपालिका, तसेच जिल्हा प्रशासन यांनी राष्ट्रीय आपत्ती अंतर्गत सामूहिक प्रयत्न कुठेही कमी दिसत नाहीत. मात्र, या प्रयत्नांंना जनतेचीही साथ मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात येत आहे.

धान्य बाजार, भाजी मार्केट यांसारख्या काही ठिकाणी अजूनही लोकांची गर्दी होत असून, त्याला प्रतिबंध होणे अपेक्षित आहे.

शुक्रवारी सकाळी वाहतूक शाखेचे पोलीस शहरात फिरून दुकानदारांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. जबरदस्ती नाही पण विनंती आहे, असे पोलीस सांगत होते. त्यामुळे दुकानदार दुकाने बंद ठेवायची की सुरू ठेवायची या विचारात होते.नागरिकांच्या मनातील भीतीमुळे शुक्रवारी शहरातील वातावरण अगदीच चिंता वाढविणारे होते. अंबाबाई मंदिर परिसर, तसेच या परिसरातील सर्व व्यवसाय बंद होते. नेहमी गजबजलेला भाऊसिंगजी रोड, ताराबाई रोड, चप्पल लाईन, महाद्वार, शिवाजी रोड, राजारामपुरी, शाहूपुरी परिसरातील दुकाने बंद होती.

शहरातील शुक्रवारचे चित्र

  •  सार्वजनिक बागा, चित्रपटगृहे बंद'
  •  शाळा, महाविद्यालये बंद
  •  अंबाबाई मंदिर, तुळजाभवानी मंदिर बंद
  •  चर्च, मस्जिद येथील प्रार्थना, नमाज बंद
  •  पानपट्टी, खाऊ गल्ली बंद
  • मॉलमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच विक्री
  •  अ‍ॅटोरिक्षांची तुरळक वाहतूक
  • केएमटीच्या ६१ गाड्या बंद

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर