शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : नव्वदी पार केलेल्या लढवय्या दादांनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:30 IST

सुरूवातीपासून कणखरपणाने सर्व क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या माजी उद्योगमंत्री, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी वयाच्या ९० व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यामुळे आवाडे कुटुंबीयांसह समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देनव्वदी पार केलेल्या लढवय्या दादांनी केली कोरोनावर मातकल्लाप्पाण्णा आवाडे यांचे ‘इंदु-कला’ मध्ये भव्य स्वागत, फुलांचा वर्षाव व पायघड्या

इचलकरंजी : सुरूवातीपासून कणखरपणाने सर्व क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या माजी उद्योगमंत्री, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांनी वयाच्या ९० व्या वर्षी कोरोनावर मात केली. त्यामुळे आवाडे कुटुंबीयांसह समर्थकांतून आनंद व्यक्त होत आहे. शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ‘इंदु-कला’ या त्यांच्या निवासस्थानी फुलांच्या पायघड्या अंथरुण फुलांचा वर्षाव करत भव्य स्वागत व औक्षण करण्यात आले.इचलकरंजीत दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठा जनसंपर्क असलेल्या संपूर्ण आवाडे कुटुंबाला लागण झाली. सुरूवातीला आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र स्वप्निल आवाडे, त्यांचे पुत्र आदित्य आवाडे, तर उत्तम आवाडे यांची सून रेवती यांना लागण झाली होती. काही दिवसांतच खासगी रुग्णालयात उपचार घेवून त्यांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर पुन्हा सर्व काही सुरळीत सुरू असताना दुसऱ्या टप्प्यात मात्र आमदार प्रकाश आवाडे यांना लागण झाली.

त्यानंतर तपासणी केली असता त्यांचे वडील माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, इंदिरा महिला सूतगिरणीच्या माजी अध्यक्षा सपना आवाडे, जि.प.सदस्य राहुल आवाडे यांच्यासह कुटुंबातील बहुतांश सदस्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

या सर्वांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा होईल, तसे सर्वजण एकेक करत घरी परतले. आमदार प्रकाश आवाडे यांनीही चार दिवसांपूर्वी कोरोनावर मात करून पुन्हा समाजकार्यात सक्रिय झाले आहेत.दरम्यान, कुटुंबातील प्रमुख व सर्वांचे आदरणीय असलेले माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आवाडे कुटुंबातील सर्वच सदस्यांनी कोरोनावर मात केली असून, संपूर्ण कुटुंबासह समर्थकांत आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKallappanna Awadeकल्लाप्पाण्णा आवाडेichalkaranji-acइचलकरंजीkolhapurकोल्हापूर