शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात ९०२ नवीन रुग्ण, २७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अपुऱ्या यंत्रणेसह कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य प्रशासनाने आता मात्र कोरोनासमोर हात टेकले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात ९०२ नवीन रुग्ण, २७ जणांचा मृत्यूजनता कर्फ्यूबाबत जनतेत संदिग्धता

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. अपुऱ्या यंत्रणेसह कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य प्रशासनाने आता मात्र कोरोनासमोर हात टेकले आहेत. एकीकडे बेड उपलब्ध करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुसरीकडे बाधितांची संख्या मात्र घटायचे नाव घेईना. गुरुवारी जिल्ह्यात ९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २७ जणांचा मृत्यू झाला.एकीकडे कोरोना दिवसेंदिवस उग्र रूप दाखवीत असताना जिल्ह्यातील जनता मात्र तितकीशी गांभीर्याने वागत असल्याचे चित्र नाही. जिल्ह्याच्या तीन-चार तालुक्यांत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून आता कोल्हापूर शहरातही तो पाळावा, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दोन दिवसांपूर्वी केले. परंतु त्याला काही व्यापारी, रिक्षा संघटनांचा विरोध होत आहे.

सर्वसामान्य जनतेची जनता कर्फ्यू लागू करण्याची तयारी असताना, दुसऱ्या बाजूने काहीजण त्याला खोडा घालत आहेत; त्यामुळे कोल्हापुरात, शुक्रवारपासून होणाऱ्या जनता कर्फ्यूबाबत संदिग्ध वातावरण आहे.जिल्ह्यात कोल्हापूर शहरासह करवीर, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यांत कोरोनाचा उद्रेक मोठा आहे. इचलकरंजी शहरातील नवीन वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी या तालुक्यांत रुग्णसंख्या घटत असली तरी साखळी काही तुटत नाही. नवीन रुग्ण समोर येतच आहेत. कोल्हापूर शहराची परिस्थिती तर अगदीच खराब आहे. कोल्हापूर शहराने रुग्णांचा दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे.जिल्ह्यात नवीन नोंद झालेल्या ९०२ रुग्णांमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३२ हजार ५२२ वर गेली आहे, तर मागच्या २४ तासांतील २७ जणांच्या मृत्यूमुळे हा आकडा ९८५ पर्यंत पोहोचला आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढलेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर