शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -सांगलीच्या सराफ पेठेत ८० टक्के व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 16:12 IST

कोरोनाच्या धास्तीने शहरातील बहुतांश व्यवसाय बंद होत आहेत. या विषाणूचा परिणाम सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सराफ कट्टा परिसरात सध्या शुकशुकाट असून, अगदीच गरज असणारे ग्राहकच दुकानात येत आहेत. जवळपास ८० टक्के व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दररोज कोट्यवधींचा फटका सराफ व्यावसायिकांना बसत आहे.

ठळक मुद्देसांगलीच्या सराफ पेठेत ८० टक्के व्यवहार ठप्पकारागीर, गलाई बांधवांची आर्थिक कोंडी

सांगली : कोरोनाच्या धास्तीने शहरातील बहुतांश व्यवसाय बंद होत आहेत. या विषाणूचा परिणाम सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सराफ कट्टा परिसरात सध्या शुकशुकाट असून, अगदीच गरज असणारे ग्राहकच दुकानात येत आहेत. जवळपास ८० टक्के व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दररोज कोट्यवधींचा फटका सराफ व्यावसायिकांना बसत आहे.सांगलीच्या सराफ पेठेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, अशी आशा असलेल्या व्यावसायिकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे सध्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे. ग्राहकांनी सराफ पेठेकडे पाठ फिरविली आहे.गेल्या पंधरा दिवसात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झाले. मध्यंतरी सोन्या-चांदीचे दर उतरूनही खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडला नाही. व्यावसायिकांच्या मते, ८० टक्के व्यवहार ठप्प झाला आहे. सांगलीच्या सराफ पेठेत दररोज ८ ते १० कोटीची उलाढाल होते. आता ही उलाढाल २० टक्क्यावर आली आहे.

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर संपूर्ण सराफ पेठच बंद ठेवावी लागणार आहे. गुढीपाडवा व त्यानंतर एप्रिल महिन्यातील विवाह मुहूर्तालाही सोन्या-चांदीची खरेदी होईल की नाही, याची धास्ती व्यावसायिकांना आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले कारागीर, गलाई बांधवांची आर्थिक कोंडी होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारSangliसांगली