शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात कोरोनाचे दोन दिवसात ३५ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 12:10 IST

गेल्या ४८ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ३५ बळी गेले आहेत. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ४०५ वर गेला आहे. आतापर्यंत १४७३७ एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ६९०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांतील मृतांमधील सर्वाधिक संख्या ही हातकणंगले तालुक्यातील आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनाचे दोन दिवसात ३५ बळी एकूण रूग्णसंख्या १५ हजारांकडे

कोल्हापूर : गेल्या ४८ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे ३५ बळी गेले आहेत. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ४०५ वर गेला आहे. आतापर्यंत १४७३७ एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत ६९०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दोन दिवसांतील मृतांमधील सर्वाधिक संख्या ही हातकणंगले तालुक्यातील आहे.जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी पाच ते रविवारी सायंकाळी पाच या २४ तासांत नवे ५८२ रुग्ण सापडले आहेत. तसेच या २४ तासांत तब्बल ६९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवार (१४) ते शनिवारी (दि. १५) सायंकाळच्या २४ तासांत तब्बल २२, तर नंतरच्या २४ तासांत १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, एकीकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील काम चांगले चालले असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी याच्या बरोबर उलटे मत मांडले आहे.

शहरात चार हजारांवर कोरोना रुग्ण

कोल्हापूर शहरात कोरोनाचे तब्बल ४०६८ रुग्ण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा कहर कायम होता. ५३९ नवीन रुग्णांची भर पडली. आत्तापर्यंत ९३ जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. एकूण १४३ रुग्ण आढळून आल्याने हॉट स्पॉटच्या यादीमध्ये शाहूपुरी परिसराचा समावेश झाला आहे.

शहरात १५ ऑगस्ट रोजी २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले; तर रविवारी आणखी २६९ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये शिवाजी पेठ २७, राजारामपुरी १५, कसबा बावडा १५, मंगळवार पेठ १४, शाहूपुरी १९, कदमवाडी १२, शनिवार पेठ १०, जरगनगर ९, सम्राटनगर ९, विचारेमाळ १८ रुग्णांचा समावेश आहे.

हॉट स्पॉटमधील रुग्ण

राजारामपुरी ३७१, शिवाजी पेठ २५३, कसबा बावडा २२३, मंगळवार पेठ २२२, शाहूपुरी १४२, संभाजीनगर १३०, जवाहरनगर ११५

नवीन ३१ परिसर सील

दोन दिवसांमध्ये नव्याने ३१ परिसर सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत २२८ परिसर सील झाले असून सध्या १३० ठिकाणी बॅरिकेट‌्स लावून परिसर बंद केले आहेत.

दोन दिवसांत सातजणांचा मृत्यू

गेल्या चार महिन्यांपासून आत्तापर्यंत कोरोनामुळे ९७ जणांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांत यामध्ये सातजणांचा समावेश आहे. कसबा बावडा येथे ५९ वर्षांची महिला, पाचगाव येथील ५१ वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथे ७६ वर्षांचा पुरुष, जरगनगर येथे ५० वर्षांची महिला, गंगावेश येथे ५४ वर्षांचा पुरुष, जुना वाशी नाका येथे ६० वर्षांचा पुरुष, राजारामपुरी पाचवी गल्ली येथील ५५ वर्षांचा पुरुष यांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर