शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात २८ मृत्यू; ५३६ नवे रुग्ण, इचलकरंजी, कोल्हापूर शहरांत कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:29 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे, रविवारी दिवसभरात तब्बल २८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील सात, तर इचलकरंजी शहरातील आठजणांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्युसंख्या ६९९ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देइचलकरंजी, कोल्हापूर शहरांत कोरोनाचा कहरमृत्युसंख्या ६९९ वर; एकूण रुग्णसंख्या २३०४२; दिवसभरात ६८७ डिस्चार्ज

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे, रविवारी दिवसभरात तब्बल २८ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील सात, तर इचलकरंजी शहरातील आठजणांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्युसंख्या ६९९ वर पोहोचली आहे. दिवसभरात ५३६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २३०४२ वर पोहोचली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरात नव्या १६५ रुग्णांची भर पडली. दिवसभरात ६८७ रुग्णांचा डिस्चार्ज देऊन घरी पाठवले, ही समाधानकारक बाब आहे.कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्येचा व मृत्यूचाही उद्रेक होत आहे. कोरोनाची स्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. गेल्या २४ तासांत ५३६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे ही रुग्णसंख्या २३०४२ वर पोहोचली आहे. तर २४ तासांत ६९९ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने डिस्चार्ज दिलेल्यांची संख्या ही १४३४७ वर पोहोचली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत ७९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दिवसभरात १७३१ अहवाल प्राप्तगेल्या २४ तासांत प्रशासनास १७३१ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यांमध्ये १२२८ निगेटिव्ह, तर ३९१ अहवाल पॉझिटिव्ह आले. ३५५ ॲन्टिजेन चाचणी अहवालांपैकी ९८, तर खासगी प्रयोगशाळेतील ४७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरात एकूण ५३६ अहवाल पॉझिटिव्ह आले. २४ तासांत जिल्ह्यातील विविध ७४ कोविड सेंटरमध्ये एकूण १६२६ जणांची स्रावचाचणी घेण्यात आली, तर ३५५ जणांची ॲन्टिजेन चाचणी घेण्यात आली.२८ जणांचा मृत्यूजिल्ह्यात २४ तासांत २८ कोरोनाग्रस्तांचे बळी गेले; तर बळींची संख्या ६९९ वर पोहोचली आहे. २४ तासांत बळी गेलेले पुढीलप्रमाणे : कोल्हापूर शहर- वय ५४/पुरुष अंबाई टँक परिसर, ७०/ महिला कळंबानजीक, ५४/पुरुष राजेंद्रनगर, ७०/ पुरुष कदमवाडी, ६५/पुरुष शास्त्रीनगर, ४०/पुरुष शिवाजी पेठ, ४६/पुरुष नाळे कॉलनी. इचलकरंजी शहर- वय ६९/ महिला आमरेमळा, ५०/पुरुष अष्टविनायकनगर, ६९/पुरुष गावभाग, ७०/पुरुष गावभाग, ६६/पुरुष शहापूर, ८०/पुरुष लिगाडे मळा, ५८/पुरुष इचलकरंजी, ६७/ पुरुष आझाद चित्रमंदिरानजीक इचलकरंजी. ६५/पुरुष माणगाव (ता. शाहूवाडी), ५०/ पुरुष शिवाजीनगर आजरा, ६५/महिला कबनूर (ता. हातकणंगले), ६५/पुरुष टाकवडे (ता. शिरोळ), ६२/पुरुष धरणगुत्ती (ता. शिरोळ), ६०/ महिला पट्टणकोडोली (ता. हातकणंगले), ७१/पुरुष तारदाळ (ता. हातकणंगले), ६६/पुरुष सरवडे (ता. राधानगरी), ६५/पुरुष हुपरी (ता. हातकणंगले), ७५/पुरुष पाडळी खुर्द (ता. करवीर). ७८/महिला बत्तीस शिराळा (ता. सांगली), ७३/पुरुष कारदगा (कर्नाटक), ६५/महिला निपाणी (कर्नाटक).जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या तालुकावार : आजरा-३४३, भुदरगड-४८५, चंदगड-५४३, गडहिंग्लज-५१०, गगनबावडा-४७, हातकणंगले-२७११, कागल-६०७, करवीर- २५४०, पन्हाळा-७७३, राधानगरी-६०८, शाहूवाडी-५०६, शिरोळ-१२१०, नगरपालिका - ४२२२ (इचलकरंजी २८४६, जयसिंगपूर ३९०, कुरुंदवाड ९२, गडहिंग्लज २०, कागल १७५, शिरोळ १३६, हुपरी ३८४, पेठवडगाव १३४, मलकापूर ०३, मुरगूड ४२).कोल्हापूर शहर - ७३२९. इतर जिल्हा/राज्य-६०८ (पुणे १३, कर्नाटक १६५, आंध्र प्रदेश ४)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर