शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:30 IST

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या चोवीस तासांत २६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ४७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार ७३५ वर जाऊन पोहोचली असून, २९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापुरात २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यूआतापर्यंत जिल्ह्यात १३०४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या चोवीस तासांत २६ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ४७३ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार ७३५ वर जाऊन पोहोचली असून, २९ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोना संसर्गाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा हॉटस्पॉट बनला होता. राज्यातील ज्या काही मोजक्या शहरांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक पहिल्या दहामध्ये लागला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर चिंता व्यक्त होत होती. राज्याच्या आरोग्य विभागानेही काही महत्त्वाच्या सूचना देऊन तशी अंमलबजावणी करण्यास बजावले होते.परंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन प्रमुख शहरांतही हीच परिस्थिती आहे. नवीन रुग्ण संख्या कमी होत असल्याने आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनावरील ताण हलका होत आहे.जिल्ह्यातील रुग्ण संख्या घटत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मात्र नियंत्रणात आलेले नाही. दररोज २५ ते ३० रुग्ण दगावत आहेत. मरण पावणारे रुग्ण केवळ कोरोनानेच नाही तर अन्य व्याधीही त्याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत जिल्ह्यात १३०४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण तीन टक्क्याच्या आसपास आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर