शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 19:03 IST

कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला; तर ३५८ नवीन रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू ८२ हजारांहून अधिक तपासण्या

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला; तर ३५८ नवीन रुग्ण आढळून आले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मोठे असल्यामुळे, आरोग्य प्रशासनास काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र मृत्यूचे प्रमाण काही कमी होत नसल्याने त्याची चिंता मात्र सतावत आहे.जिल्ह्यात मंगळवारी १९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ४३९ वर जाऊन पोहोचली आहे; तर नवीन ३५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १५ हजार ६३१ वर गेली आहे. मागच्या तीन दिवसांत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या दीड हजार आहे. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण साधारणपणे तीन टक्क्यांपर्यंत असून, ते कमी करण्यात अद्याप प्रशासनास यश मिळाले नसल्याने यंत्रणा त्रस्त आहे.कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. पालकमंत्री सतेज पाटील सर्व आरोग्य यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते सतत सूचना करीत आहेत. काही तातडीचे निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणीही करताना पाहायला मिळत आहे.८२ हजारांहून अधिक तपासण्याकोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार ८७३ इतक्या कोरोना तपासण्या झाल्या आहेत. दहा लाख लोकसंख्येमागे १९ हजार ५५० इतक्या तपासण्यांचे प्रमाण असून, ते देशाच्या तुलनेत जास्त आहे; तर पॉझिटिव्ह रुग्ण येण्याचे प्रमाण १८ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर