शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

corona virus : कोल्हापुरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू; ४५४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:18 IST

कोल्हापूरकरांना सोमवारी काहीअंशी दिलासा मिळाला असताना मंगळवारी मात्र जिल्ह्यात दिवसभरात ४५४ नवीन बाधित रुग्ण आढळून आले तर अकरा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोल्हापुरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू; ४५४ नवे रुग्णकोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांवर

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना सोमवारी काहीअंशी दिलासा मिळाला असताना मंगळवारी मात्र जिल्ह्यात दिवसभरात ४५४ नवीन बाधित रुग्ण आढळून आले तर अकरा रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांवर जाऊन पोहोचली. जिल्ह्यात कोरोनाचा फैलावामुळे वाढत असलेल्या बाधित रुग्ण आणि मृत्यूंच्या संख्येने आरोग्य यंत्रणेची झोप उडविली आहे.सुरुवातीच्या काळात अत्यंत सुरक्षित वाटणारा कोल्हापूर जिल्हा जुलै महिन्याच्या अखेरीस रेडझोनमध्ये कधी जाऊन पोहोचला समजले नाही. दि. १ जुलैला जिल्ह्यात ११८ पॉझिटिव्ह रुग्ण होते. तर बारा व्यक्तींचा मृत्यू झाला होता. मागच्या २८ दिवसांत ही संख्या ५०७५ रुग्णांवर जाऊन पोहोचली, तर मृतांची संख्या १४० वर जाऊन पोहोचली. ही आकडेवारी नक्कीच प्रशासनाची चिंता वाढविणारी तर कोल्हापूरकरांच्या मनात धडकी भरविणारी आहे.येथील सीपीआर रुग्णालयाने मंगळवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. २७) रात्री ते मंगळवारी सकाळपर्यंत २०८ रुग्ण आढळून आले होते. रात्रीपर्यंत या संख्येत आणखी २४६ रुग्णांची भर पडल्याचे सांगण्यात आले. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात अकरा जणांचा मृत्यू झाला. त्यात तीन महिलांसह आठ पुरुषांचा समावेश आहे.मृतांपैकी सहा व्यक्ती कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ, साळोखेनगर, उत्तरेश्वर, शनिवार पेठ, खरी कॉर्नर, गुरुवार पेठ या परिसरात राहणाऱ्या होत्या. इचलकरंजी शहरातील खंजिरे मळा व लायकर टॉकीजजवळील, तर करवीर तालुक्यातील सांगरूळ फाटा व पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. चोवीस तासांतील अकरा मृत्यूमुळे कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या १४० वर जाऊन पोहोचली.पाच हजारांचा टप्पा पूर्णजिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ५०७५ वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील १९३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांपैकी २७५६ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जुलै महिना कोल्हापूरकरांसाठी दुर्दैवी ठरला आहे. कारण केवळ २८ दिवसांत हजारो रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यावरूनच कोरोनाचा संसर्ग किती वेगात झाला हे स्पष्ट होते.कोल्हापूर, इचलकरंजी हॉटस्पॉटकोल्हापूर व इचलकरंजी ही दोन प्रमुख शहरे कोरोना संसर्गाच्या विळख्यात सापडली आहेत. आधी कुटुंब संसर्गानंतर समूह संसर्ग असे वळण घेत या दोन शहरांना कोरोनाने जबरदस्त दणका दिला आहे. कोल्हापूर शहरात मंगळवारी ११० तर इचलकरंजी शहरात ४२ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोल्हापर शहरात आतापर्यंत १२६० तर इचलकरंजी शहरात ८४० वर रुग्णसंख्या पोहोचली. ही दोन्ही शहरे हॉटस्पॉट ठरली आहेत.वरिष्ठ शासकीय अधिकारी पॉझिटीव्ह

जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी काही दिवसापूर्वी कोरोना बाधित असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा एक भाग बंद करण्यात आला होता. मंगळवारी तर जिल्हाधिकारी कार्यालयास आणखी एक धक्का बसला. गेल्या चार पाच महिन्यापासून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी सातत्याने दिवस रात्र काम करुन कोरोना विरुध्दची लढाई लढत आहेत. दुदैवाने याच कार्यालयातील एक अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याची माहिती रात्री उशिरा आली आणि संपूर्ण कार्यालय हादरुन गेले. या अधिकाऱ्याची अनेक बैठकांना उपस्थिती असते. त्यामुळे अनेकांची धाकधुक वाढली आहे.

तालुका निहाय आकडे-

आजरा - ११२, भुदरगड - १०३, चंदगड - ३४९, गडहिंग्लज - २१४, गगनबावडा - ९, हातकणंगले -३८०, कागल - ८७, करवीर - ५७९, पन्हाळा - २१०, राधानगरी - १५७, शाहुवाडी - २६३, शिरोळ - १८७ , नगरपालिका - १०८२, कोल्हापूर शहर - १२७६, इतर जिल्हा - ६७- एकूण रुग्ण - ५०७५, - मयत - १४२,- उपचार घेत असलेले रुग्ण -२८४१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर