शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनावर १०३ वर्षांच्या आजीची मात, व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमधून डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:05 IST

दिगंबर जैन बोर्डिंगमधील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाळाबाई या १०३ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली. बुधवारी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून, झाड लावून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ह्यह्यो कोरोना म्हणजे संशयाचा आजार आहे. त्याला हसत-खेळत सामोरे जा, आनंदी रहा,ह्ण असा कानमंत्र देऊन त्या घरी गेल्या. त्यांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.

ठळक मुद्देव्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमधून डिस्चार्ज ह्यो संशयाचा रोग, आनंदी रहा : आजींनी दिला कानमंत्र

कोल्हापूर : दिगंबर जैन बोर्डिंगमधील व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या बाळाबाई या १०३ वर्षांच्या आजींनी कोरोनावर मात केली. बुधवारी त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून, झाड लावून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ह्यह्यो कोरोना म्हणजे संशयाचा आजार आहे. त्याला हसत-खेळत सामोरे जा, आनंदी रहा,ह्ण असा कानमंत्र देऊन त्या घरी गेल्या. त्यांना निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.सम्राटनगरमध्ये राहणाऱ्या या आजींचे नाव बाळाबाई विठ्ठल मोकाशी. १० दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील सगळ्याच व्यक्तींचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आणि इतक्या वयोवृद्ध रुग्णाची जोखीम घ्यायला कोणताही दवाखाना तयार नव्हता. अखेर त्यांना व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या आजींना कोरोनाची लक्षणे नव्हती; पण वय आणि औषधोपचारांना त्या कसा प्रतिसाद देतात, यावरही बरेच अवलंबून होते.पहिल्या दिवसापासून त्यांच्याभोवतीचे वातावरण अगदी खेळीमेळीत ठेवले गेले. सुरुवातीला जेवणामुळे पोटाचा त्रास झाल्यानंतर त्यांच्या जेवणात अधिक पौष्टिक पदार्थांचा समावेश केला गेला. नंतर घरून जेवण येऊ लागले. आजींची स्मरणशक्ती एकदम चांगली; त्यामुळे आपल्या जुन्या काळातील सगळ्या आठवणी त्या रुग्णांना सांगायच्या, निवांत गप्पा मारीत बसायच्या. मी दारात खूप झाडं लावलीत, पालेभाज्या पण पिकवते, आमच्या घरी बघायला या, असे त्या सगळ्यांना सांगायच्या. रोज सकाळ-संध्याकाळ वाफ, गोळ्या, चूर्ण असा त्यांचा दिनक्रम होता.सेंटरमध्ये रोज योगा, प्राणायाम, हास्य क्लब घेतला जातो. त्यावेळीही आजी येऊन बसायच्या. जमेल तसे करायच्या. आवारात फिरायच्या. परिणामी १० दिवसांनंतर आजी ठणठणीत बऱ्या झाला. नातू बबन मोकाशी याने त्यांना घरी नेले. बुधवारी आजींचा वाढदिवसही होता. त्यामुळे डिस्चार्ज दिल्यानंतर आवारात केक कापून त्यांना वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या हस्ते लिंबाचे झाड लावण्यात आले.

घरी परतताना आजी म्हणाल्या, ह्यो संशयाचा आजार आहे. लोक संशय घेऊन औषधपाणी करायला जातात. मनात भीती बाळगू नका, आनंदी रहा. इथे माझी छान काळजी घेतली गेली.त्यांना निरोप देताना सेंटरच्या कर्मचाऱ्यांच्याही डोळ्यांत आनंदाश्रृ आले. यावेळी व्हाईट आर्मीचे प्रमुख अशोक रोकडे यांच्यासह कोल्हापूर मेडिकल असोसिशएनचे डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. गीता पिल्लई, शीतल पाटील उपस्थित होत्या. हीना यादवाड, प्रशांत शेंडे, सेल्विना चव्हाण, अरविंद लवटे, सिद्धेश पाटील, प्रेम पवार, प्रेम सातपुते यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर