शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संशयिताचा मृत्यू, अंत्यविधीसाठी बैतुलमाल कमिटी आली धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 16:29 IST

इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली.

ठळक मुद्देइचलकरंजी येथील कोरोना संशयितावर कोल्हापुरात अंत्यसंस्कारबैतुलमाल कमिटीचा सामाजिक उपक्रम सुरूच

कोल्हापूर : इचलकरंजी येथील कोरोना संशयिताचा सीपीआर रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करायचे असा त्यांचा प्रश्न होता. अशावेळी बैतुलमाल कमिटी त्यांच्या मदतीला धावून आली.कोल्हापूर येथील बैतुलमाल कमिटीचे सदस्य बुधवारी (दि. २२) दुपारी मुस्लिम समाजातील तीन व्यक्ती मृत झाल्याने सीपीआर येथे अंत्यविधीच्या मदतीसाठी गेले होते. तेथे दुपारी अतिदक्षता विभागाबाहेर एक दाम्पत्य जोरात आक्रोश करीत होते.

याबाबत नगरसेवक तौफिक मुल्लाणी, राजू नदाफ यांनी त्या दाम्पत्याची चौकशी करून त्यांचा इचलकरंजी येथील स्थानिक नगरसेवक रणजित जाधव यांच्याशी संपर्क करून दिला. त्यांनी मृत महिलेच्या पतीला कोल्हापूर पाठवतो; पण अंत्यसंस्कार तेथेच करा, असे सांगितल्याने बैतुलमाल कमिटीचे मौलाना जाफर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री त्या महिलेच्या मृतदेहावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

या परिवाराला कोल्हापुरातील काहीही माहिती नसल्याने अंत्यसंस्काराच्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यात बैतुलमाल कमिटीच्या मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला व अचानक घडलेल्या दु:खाने हतबल झालेल्या कुटुंबाला आधारही दिला. या कुटुंबाने अतिशय भावनिक होऊन सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले. मृताचा कोरोना अहवाल अद्याप प्रलंबित आहे.यावेळी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, नवेझ मुल्ला ,राजू नदाफ, जाफर मलबारी, वासीम चाबूकस्वार, सैफुल्ला मलबारी, लालू मीरशिकारी, सादिक रंगरेज, जाफर महात आणि कोल्हापूर महानगरपालिका, सीपीआर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बैतुलमाल कमिटीच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीत दुसरा अंत्यसंस्कार करण्यात आला. यापूर्वी गेल्या आठवड्यात इचलकरंजीतीलच कोरोना रुग्ण असलेल्या हिंदू मृत व्यक्तीवर अशाच पद्धतीने मुस्लिम तरुणांनी अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम