कुस्तीपंढरी म्हणून जिल्ह्यात नावलौकिक असणाऱ्या या गावात कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि उपाययोजनेच्या माध्यमातून अत्यंत उल्लेखनीय धडपड सुरू आहे.
निपाणी येथील डॉ. प्रशांत अथणी यांनी पाच बेड, तर तानाजी पाटील (फौजी) यांनी ऑक्सिजनचे मशीन दिले आहे. नेताजी कमळकर, रमेश रेडेकर (सरंबळवाडी) यांनीही मदतीचा हात पुढे केला.
यासाठी सरपंच वंदना रमेश सावंत, पंचायत समिती सदस्या मनीषा सावंत, उपसरपंच दत्तात्रय लंबे, सुनील बोंगार्डे, युवराज पाटील, चंद्रकांत शिंदे, बाळ पोतदार, विनायक पाटील, नीलेश कदम, विनायक जगदाळे, युवराज बोंगार्डे, मदन पाटील, मनोहर पाटील, रवींद्र पाटील, अमर पाटील, भगवान पाटील, लक्ष्मण पाटील, बाळासाहेब गुरव, अर्जुन गुरव, आदी परिश्रम घेत आहेत.