बानगे(ता. कागल) येथील कोरोना रुग्णांवर गावातच उपचार व्हावेत, नागरिकांवर आर्थिक ताण येऊ नये या हेतूने ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून तरुणांच्या पुढाकाराने दोन ऑक्सिजन बेडसह २० बेडचे कोरोना सेंटर उभारले आहे. प्राथमिक शाळेत हे सेंटर केले आहे. सिध्दनेर्ली जि. प. मतदारसंघातील पहिलेच सेंटर आहे. येथे कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण, जनजागृती आणि उपाययोजनेच्या माध्यमातून अत्यंत उल्लेखनीय धडपड सुरू आहे.
निपाणी येथील डॉ. प्रशांत अथणी यांनी ५बेड, तानाजी पाटील(फौजी) यांनी ऑक्सिजनचे मशीन दिले. तर नेताजी कमळकर, रमेश रेडेकर (सरंबळवाडी), विपुल विलास पाटील यांनीही मदत केली.
यासाठी सरपंच वंदना रमेश सावंत, पं. स.सदस्या मनीषा सावंत, उपसरपंच दत्तात्रय लंबे, सुनील बोंगार्डे, युवराज पाटील, चंद्रकांत शिंदे, बाळासाहेब गुरव, अर्जुन गुरव, चंद्रशेखर सावंत, अमोल सावंत, अशोक पाटील, तुकाराम सावंत, बाबुराव हिरुगडे, बाळ पोतदार, विनायक पाटील, निलेश कदम, विनायक जगदाळे, युवराज बोंगार्डे, मदन पाटील, मनोहर पाटील, ग्रामसेवक पी. के. पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.