शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्यमबाग पोलिसांनी 3 लाख 70 हजार रुपयाची दारू केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:44 IST

गोव्याहून बेळगावला बेकायदेशीररित्या बनावट दारू घेऊन येणाऱ्या दोघांना सोमवारी उद्यमबाग पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. तिसऱ्या रेल्वे गेट येथे उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.

ठळक मुद्देउद्यमबाग पोलिसांनी 3 लाख 70 हजार रुपयाची दारू केली जप्तबनावट दारू घेऊन येणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले

बेळगाव : गोव्याहून बेळगावला बेकायदेशीररित्या बनावट दारू घेऊन येणाऱ्या दोघांना सोमवारी उद्यमबाग पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. तिसऱ्या रेल्वे गेट येथे उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे.संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे मद्याची दुकानेही बंद आहेत. त्यामुळे तळीरामांचा घसा कोरडा करण्यासाठी सोमवारी दोघांनी गोव्याहून बेळगावला तब्बल 3 लाख 70 हजार रुपये किमतीची दारू आणत होते. याची माहिती उद्यमबाग पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करून दारू व गूडस टेम्पो जप्त केला आहे.

या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लॉक डाऊन काळात बेळगाव येथे सर्वात मोठी कारवाई असल्याचेही उघडकीस आले आहे.मंजुनाथ सुरेश पाटील (राहणार फोर्ट रोड) सुभाष सुधीरडे (राहणार महादेव रोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी गोव्यावरून केए 22 जी 3382 वाहन जप्त करण्यात आले आहे. तिसऱ्या रेल्वे गेट येथे ही कारवाई केली आहे. पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहन व बेकायदेशीरित्या करण्यात येणारी दारू व वाहन ताब्यात घेतले आहे.याबाबत उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. गोव्याहून बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या घटनेची माहिती आधीच समजली होती. त्यामुळे तिसऱ्या रेल्वे गेट समोर नाकाबंदी करून त्यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर वाहनाची चौकशी केली असता वाहनांमध्ये 3 लाख 70 हजार रुपयांची बेकायदेशीर दारू आढळून आलेले आहे. त्यामुळे दारू व दोघांना अटक करण्यात आली आहे. यापुढेही लॉक डाऊन काळात जर असे कोणी प्रकार केल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारीbelgaonबेळगाव