शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे दोन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:48 IST

मुंबईहून कर्नाटककडे निघालेल्या कंटेनरमधील किणी टोलनाक्यावर ताब्यात घेतलेल्या २९ पैकी आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

ठळक मुद्देइचलकरंजी शहरातही कोरोनाची एन्ट्री जिल्ह्यात कोरोनाबाधीत संख्या पोहोचली १० वर

कोल्हापूर : मुंबईहून कर्नाटककडे निघालेल्या कंटेनरमधील किणी टोलनाक्यावर ताब्यात घेतलेल्या २९ पैकी आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

रविवारी याच कंटेनगरमधील पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच कंटेनरमधील आणखी एका ४२ वर्षीय महिलेची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे शिवाय इचलकरंजीमध्ये ६० वर्षीय व्यक्तीलाही लागण झाल्याचा अहवाल आला आहे. जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १० वर पोहोचली आहे.मुंबईतील सांताक्रुझ भागातून कंटेनरमधून २७ जण लपून कर्नाटकातील हसन जिल्ह्याकडे जात होते. राष्ट्रीय  महामार्गावर शुक्रवारी (दि. १७) हा कंटेनर किणी टोलनाक्यावर पोलिसांनी अडविला. त्यावेळी त्या कंटेनरमधील चालक, वाहकांसह एकूण २९ जणांना ‘सीपीआर’च्या कोरोना कक्षात आणून त्यांना क्वारंटाईन केले होते.

त्यापैकी ५० वर्षीय व्यक्तीस रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्या रुग्णास तातडीने वेगळे केले. त्यानंतर याच कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या आणखी एका ४२ वर्षीय महिलेचा चाचणी अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत चार टप्प्यांत मिरज येथून आलेल्या ४३ चाचणी अहवालांपैकी ४२ निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कंटेनरमधील एकूण २९ जणांच्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना तातडीने वेगळे करण्यात आले आहे तर इतरांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.दरम्यान, इचलकरंजी शहरातही कोरोना विषाणूंनी एन्ट्री केली आहे. सोमवारी दुपारी आयजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६० वर्षीय वृद्धास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण इचलकरंजीतील कोले मळा परिसरातील आहे.

चार दिवसांपूर्वी विजापूरहून इचलकरंजी येथे अंत्यविधीसाठी आलेल्या एकास दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे विजापूरमध्ये चाचणीत स्पष्ट झाले आहे. त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या इचलकरंजीतील व्यक्ती संपर्कात आली होती.

त्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल केले होते, त्यांच्या घशातील स्राव शुक्रवारी घेतले होते. त्याचा पॉझिटिव्ह चाचणी अहवाल सोमवारी प्राप्त झाला. त्यामुळे याही रुग्णाला तातडीने वेगळे करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय