शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -बाप रे ! जिल्ह्यात कोरोनाचे आणखीन अकरा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 19:27 IST

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी दुपारपर्यंत नव्या सात बाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या एकूण ५८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यांतील नागरिकांचे लोंढे वाढू लागल्याने गेल्या पाच दिवसांत सुमारे ३४ नव्या बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्हा हादरला आहे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत नव्या ७ रुग्णांची वाढपाच दिवसांत तब्बल ३४ रुग्ण वाढले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखीन अकरा रुग्ण आज सायंकाळी आढळले आहेत. यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.कोल्हापुरात आज सकाळी पाच, दुपारी दोन आणि सायंकाळी पुन्हा तब्ब्ल अकरा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथील एक, करंजोशी येथील एक, सांबु येथील दोन, आजरा तालुक्यातील एक, करवीर तालुक्यातील एक, आणि कोल्हापूर शहरातील जवाहर नगर येथील एक, माकडवाला वसाहत येथील एक असे मिळून तबब्ब्ल पाच असे अकरा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी दुपारपर्यंत नव्या सात बाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या एकूण ५८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यांतील नागरिकांचे लोंढे वाढू लागल्याने गेल्या पाच दिवसांत सुमारे ३४ नव्या बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्हा हादरला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई, पुण्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने तीच धोक़्याची घंटा कोल्हापूरवासीयांना ठरत आहे. रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील राधानगरी व भुदरगड तालुक्यांतील प्रत्येकी दोन रुग्ण, तर पन्हाळा आणि कोल्हापूर शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. 

सोमवारी दुपारपर्यंत सात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये राधानगरी, आजरा आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी तीन तर पन्हाळा तालुक्यातील एका अशा सात नागरिकांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा हादरला आहे.विशेष म्हणजे, दि. १३ मे रोजी जिल्ह्यात फक्त २४ बाधित रुग्ण होते. पण मुंबई, पुण्याकडील नागरिकांचे लोंढे वाढल्याने गेल्या पाच दिवसांत तब्बल ३४ नव्या बाधित रुग्णांची भर पडल्याने कोल्हापूर जिल्हा रेड अलर्टवर येतो का ही भीती सर्वसामान्य नागरिकांत व्यक्त होऊ लागली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर