शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

corona in kolhapur : शिरोळ तालुक्यातील ड्रायव्हर कोरोनाचा संशयित, ११ दिवसानंतर दिसली लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 13:03 IST

शिरोळ तालुक्यातील एका ड्रायव्हरला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देशिरोळ तालुक्यातील ड्रायव्हर कोरोनाचा संशयित ११ दिवसानंतर दिसली लक्षणे

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील एका ड्रायव्हरला कोरोनाची बाधा झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.इचलकरंजी येथील एका व्यापारी कुटूंबातील मुलगा आॅस्ट्रेलियात रहात होता. २२ मार्च रोजी तो विमानाने मुंबईला आला. त्याला आणण्यासाठी म्हणून शिरोळ तालुक्यातील एका गावातील २९ वर्षांचा एका चालकाने या कुटूंबियांची गाडी घेउन मुंबईला गेला. २३ मार्च रोजी तो त्याला घेउन परत आला. त्यावेळी तया युवकाच्या हातावर होम कॉरोन्टाईनचा शिक्का मारला. त्या दिवशी हा तरुण ड्रायव्हर त्या कुटूंबियांच्या घरी राहिला.दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून या तरुणाला सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे अशाप्रकारचा त्रास सुरु झाला. बुधवारी सायंकाळी मात्र, त्याचा त्रास वाढल्यामुळे त्याला बुधवारी सायंकाळी सीपीआरमधील विशेष कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. त्याच्या घशाचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.तब्बल अकरा दिवसांनंतर दिसली लक्षणे२२ मार्च रोजी आॅस्ट्रेलियातून परतलेल्या युवकाच्या संपर्कात आलेल्या या ड्रायव्हरला तब्बल अकरा दिवसांनी म्हणजेच १ एप्रिल रोजी कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे काळजी न घेता वावरल्याचा फटका या ड्रायव्हरला बसलेला आहे. त्यामुळे इतक्या दिवसांनंतरही या आजाराशी संबंधित लक्षणे दिसू शकतात, याबद्दल काळजी घेण्याची गरज आहे.बाहेरुन आलेल्यांनी तपासणी करुन घ्यावीअजूनही अनेक लोक बाहेरुन कोल्हापूरात आले असतील तर त्यांनी स्वत:ची तपासणी करुन घ्यावी आणि होम कॉरन्टाईन पाळावे. अन्यथा आठवडभरात काही झाले नाही, या समजूतीत राहू नये. कोरोनाशी संंबंधित लक्षणे दिसत असतील तर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी आणि कोरोनाचा फैलाव होउ नये, याची काळजी घ्यावी.चंदगड तालुक्यातील २५ जण इन्स्टिट्यून्शन कॉरन्टाईनचंदगड तालुक्यातील मजले शिरगाव येथील ६५ वर्षांच्या मुंबईहून आलेल्या व्यक्तीचा मंगळवारी अचानक मृत्यू झाला. त्याच्या घशाचे स्त्रावही घेण्यात आले नव्हते. पण त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले असून त्यांना मंगळवारीच गडहिंग्लज येथे इन्स्टिट्यून्शल कॉरोन्टाईन करण्यात आले आहे.कोल्हापूरातील २0 जणांच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी रवानाकोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल २0 जणांच्या घशांचे स्त्राव बुधवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आज सायंकाळी उशिरा अपेक्षित आहे.मिरजेतील तपासणी प्रयोगशाळेचे काम लवकरचमिरज येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळेचे काम आज किंवा उद्या सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे पुण्यातील प्रयोगशाळेत केले जाणाऱ्या तपासणीचे काम लवकर सुरु होउन अहवाल तत्काळ मिळण्यास सुरुवात होतील. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर