शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur : सांगरूळचा अकरा फुटांचा पैलवान कोरोना विरुद्धच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 16:56 IST

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी अकरा फुटी पैलवान तयार करून त्याच्या माध्यमातून ते कोरोनाविरुद्धच्या आखाड्यात उतरले आहेत. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रबोधन सुरू केल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

ठळक मुद्दे सांगरूळचा अकरा फुटांचा पैलवान कोरोना विरुद्धच्या आखाड्यातगल्लोगल्ली जाऊन चंद्रकांत जंगम करताहेत कोरोनाचे प्रबोधन

कोल्हापूर : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी अकरा फुटी पैलवान तयार करून त्याच्या माध्यमातून ते कोरोनाविरुद्धच्या आखाड्यात उतरले आहेत. गल्लोगल्ली जाऊन त्यांनी प्रबोधन सुरू केल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.कोरोनाच्या लढाईत सांगरूळचा लॉकडाऊन पॅटर्न सर्वत्र चर्चेत राहिला. सध्या गावात दक्षता समिती जरी काम करीत असली तरी चंद्रकांत जंगम यांनी वेगळ्या प्रकारे लोकांचे प्रबोधन सुरू केले आहे. जंगम हे गणेशोत्सवाच्या काळात विविध प्रकारच्या कलाकृती करून त्यातून समाजप्रबोधनाचे काम करतात. त्यांचे हे काम अविरतपणे सुरू आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अकरा फुट उंचीच्या फेटेवाल्या पैलवानाची प्रतिकृती तयार केली. पैलवानाच्या गळ्यात घरी रहा - सुरक्षित रहा, आता आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार, लक्षात ठेवा, सूट शासनाने दिली, कोरोनाने नव्हे अशा घोषणा अडकवल्या आहेत. जंगम स्वत: हा पैलवान हाताळतात. त्या प्रतिकृतीमध्ये उभे राहून ते गल्लोगल्ली जाऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करीत आहेत.

सांगरूळचे ज्येष्ठ शिल्पकार स्वर्गीय गणपतराव जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन चित्रकला व शिल्पकला आत्मसात केली. हे ज्ञान आत्मसात करत असताना जाधव गुरुजींकडील सेवाभावी वृत्तीसुद्धा अवगत केली. सध्या कोरोनाच्या संकटाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत लोकांना प्रबोधनाची गरज आहे, म्हणूनच हा प्रयत्न केला.- चंद्रकांत जंगम (सांगरूळ)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर