शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur : आजरा तालुक्यातील पॉझीटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील २८ जण क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:33 IST

आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

ठळक मुद्देकोरोना पॉझीटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील २८ जण क्वारंटाईन कोल्हापूर येथे स्वॅब तपासणीसाठी पाठविले

सदाशिव मोरेआजरा : आजरा तालुक्यातील हारुर येथील मुंबईवरुन आलेले आई व मुलगा कोरोना पॉझीटीव्ह आले आहेत. सकाळी याची माहिती मिळताच प्रशासनाने या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना क्वारंटाईन केले. सर्वांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी काढून घेतले असून ते कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.

लॉकडाऊनमधील जनजीवन सुरळीत होत असतानाच हारुरमध्ये कोरोनाचे पॉझीटीव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सर्वच गावांमध्ये स्मशानशांतता पसरली असून भितीयुक्त वातावरण आहे.मुंबई पोलीस दलात सेवेत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल ( बी.डी.डी.चाळ मुंबई ) यांच्या मोठ्या मुलाचे मंगळवार दि. ५ मे रोजी निधन झाले. त्याचा मृतदेह घेवून मुंबईतून चौघेजण हारुर येथे बुधवार दि. ६ मे रोजी आले.  ग्रामस्थांनी मृतदेह गावात घेण्यास विरोध केल्याने गावाबाहेरील स्मशानभूमीत भाऊबंद व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणेत आले.अ‍ॅब्युलन्समधील तिघांचे गुरुवारी गडहिंग्लज येथे स्वॅब घेणेत आले. त्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असलेली आई व मुलगा पॉझिटिव्ह तर सोबत असणारी भावजयीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. आई व मुलाला सी.पी.आर.हॉस्पीटल कोल्हापूर येथे तर भावजयीवर आजऱ्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.हारुरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याने सकाळपासूनच तहसिलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी गावातच तळ ठोकून माहिती घेण्यास सुरुवात केली. आरोग्य सेवक, आशा व अंगणवाडी सेविकांच्यामार्फत सर्व्हे करण्यात आला.

पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या भाऊबंद व नातेवाईक यांची माहिती दुपारी दोनपर्यंत गोळा केली. त्यानंतर आजरा येथील केव्हीड सेंटरमध्ये डॉ.अशोक फर्नांडीस व डॉ. राऊत यांनी तपासणी करुन त्यांच्या घशातील स्वॅब काढण्यात आले.हारुरमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज प्रशासनाने हारुर गावाच्या सात कि. मी. चार परिसर प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषीत केला. सात कि. मी.च्या १४ गावातील सर्व गावांचे प्रवेशद्वार बंद करुन लॉकडाऊन केले आहे.त्यापाठोपाठ आजरा तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून सर्व गावांच्या सीमा बंद करणेत आल्या आहेत. हारुरच्या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र भितीयुक्त वातावरण पसरले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर