शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-फिरस्त्याची उचलबांगडी, सीपीआरमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:45 IST

दसरा चौक परिसरातील शाहू स्मारक भवन समोर रस्त्यावरील फूटपाथवर मास्क न लावता आरडाओरड करीत बसलेल्या फिरस्त्याची व्हाईट आर्मीच्या जवानांनी उचलबांगडी करून सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

ठळक मुद्देफूटपाथवर मास्क न लावता आरडाओरड फिरस्त्याची उचलबांगडी, सीपीआरमध्ये दाखल

कोल्हापूर : दसरा चौक परिसरातील शाहू स्मारक भवन समोर रस्त्यावरील फूटपाथवर मास्क न लावता आरडाओरड करीत बसलेल्या फिरस्त्याची व्हाईट आर्मीच्या जवानांनी उचलबांगडी करून सीपीआर रुग्णालयात दाखल केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे. ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.  दसरा चौकातील शाहू स्मारकच्या समोरील फूटपाथवर एक फिरस्ता मोठमोठ्याने ओरडत बसलेला होता.

या मार्गावरून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या तो निदर्शनास आला. एका जागरुक नागरिकाने व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी जवान विनायक भाट, सुमित साबळे यांना रवाना केले. या जवानांनी त्या फिरस्त्याकडे विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्या पायास दुखापत झाली होती.

रक्तस्राव होत असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी जवान पुढे सरसावले असता त्याने हुज्जत घातली. तोंडाला मास्क नाही, कसली सुरक्षा नाही, पोटाला काही नाही, अशा अवस्थेतील फिरस्त्याची अखेर जवानांनी उचलबांगडी करून सीपीआरमध्ये दाखल केले. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय