शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

corona in kolhapur-कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 'गडहिंग्लज पालिका' सज्ज..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:27 IST

'कोरोना'चा मुकाबला करण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील सर्व प्रभागात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. रस्ते - गटारींची दैनंदिन सफाई, कचरा उठाव, डास निर्मूलनासाठी औषध फवारणी आणि स्वच्छ व शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या मुकाबल्यासाठी 'गडहिंग्लज पालिका' सज्ज..!

गडहिंग्लज : 'कोरोना'चा मुकाबला करण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील सर्व प्रभागात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. रस्ते - गटारींची दैनंदिन सफाई, कचरा उठाव, डास निर्मूलनासाठी औषध फवारणी आणि स्वच्छ व शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.परदेशातून आणि मुंबई, पुणे आदी कोरोनाचा संसर्ग झालेल्या शहरातून गडहिंग्लज मध्ये आलेल्यांचा घरोघरी जाऊन शोध घेतला जात आहे, त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरिता दोन अधिकारी नेमण्यात आले आहेत.या संदर्भातील पाहणीची पहिली फेरी पूर्ण झाली आहे.महाराष्ट्रातील कोरोना संसर्गित शहरातून गडहिंग्लजमध्ये आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना आपापल्या घरातच स्वतंत्र राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.परंतु, त्यापैकी काही मंडळींकडून त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.अशांसाठी गडहिंग्लज शहरात दोन ठिकाणी सक्तीची विलगीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.नगरपालिकेतर्फे आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करवून घेण्यात आली आहे.त्यांना मास्क, सॅनिटायझर , साबण आदी वस्तु पुरविण्यात आल्या आहेत.स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात त्यांना विशेष. सूचनाही देण्यात आल्या आहेत.नगराध्यक्षा प्रा.स्वाती कोरी, उपनगराध्यकक्षा शकुंतला हातरोटे व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेची यंत्रणा कोरोनाचा यशस्वी सामना करण्यासाठी झटत आहे.घंटागाडीवरून आवाहन...!कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव रोखण्यासंदर्भातील आवाहन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीवरील लाऊडस्पिकरवरून करण्यात येत असून वाहनांचे हॅण्डबिल्सदेखील घरोघरी वाटण्यात येत आहेत.'त्यांचा' कचराही वेगळा...!परदेशातून गडहिंग्लज शहरात आलेल्या ९ कुटुंबातील १५ नागरिकांना सक्तीने 'होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे.त्या ९ घरातील कचरादेखील स्वतंत्रपणे जमा करून त्याची विल्हेवाट शास्त्रीयपध्दतीने लावली जात आहे.अंतर्गत वाहतूक बंद...!प्रत्येक प्रभागातील लहान, मोठ्या गल्लीत दगड आणि लाकडी ओंडके लावुन नागरिकांनी गडहिंग्लज शहरातील बहुतेक अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी उत्स्फूर्तपणेबंद केले आहेत.गडहिंग्लज शहरात २३ ठिकाणी मिळणार भाजीपाला...!गडहिंग्लज : संचारबंदीच्या काळात नागरिकांना भाजीपाला आपापल्या घरानजीक उपलब्ध व्हावीत यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेने शहरातील ९ प्रभागात २३ ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिली.घरपोच भाजीपाला देण्यासाठी अभिनव सामाजिक संस्था आणि अ‍ॅमिकस वेजेटिया या दोन संस्था पुढे आल्या आहेत. त्यांच्याकडून भाजीपाला खरेदी करता येणार आहे.त्याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरात मिळून एकूण २३ ठिकाणी भाजीपाला खरेदी - विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.काळभैरी रोडवरील मारुती मंदिर, भीमनगर कमान, निलकमल हॉटेल, पिराजी पेठ, शिवाजी चौक, पाटणे गल्ली, मुल्ला मस्जिद चौक, कोंडा बाजार, एम.आर.हायस्कूल , शिवाजी रोडवरील कदम मेडिकल, आझाद रोडवरील हिंदवी ग्रुप. कडगाव रोडवरील भगवा चौक शिवाजी विद्यालय, गांधीनगर येथील ऐरावती हॉटेल, सरस्वतीनगर, भूमी अभिलेख कार्यालय,आजरा रोडवरील राधाकृष्ण मंदिर, आयोध्यानगर कॉर्नर, मुलींचे हायस्कूल, मांगलेवाडी, हाळलक्ष्मी मंदिर, शेंद्री रोड बिरोबा मंदिर, भडगाव रोडवरील संकल्प नगर याठिकाणी भाजीपाला विक्री करण्यास व्यापारी व शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.त्या ठिकाणी गर्दी न करता नागरिकांनी भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर