शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur -कोल्हापूरात विक्रमनगरात एका युवतीला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 17:32 IST

कोल्हापुरातील विक्रमनगरातील स्वामी समर्थ मंदिर परिसरात १८ वर्षाच्या तरुणीस कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापूरात विक्रमनगरात एका युवतीला कोरोनाजिल्हा आॅरेंज झोनमध्येच, कोल्हापूरकरांना दिलासा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी एकाच दिवसात चार रुग्ण आढळून आल्यानंतर आज मंगळवारी विक्रमनगर येथील दाट वस्तीत एक अठरा वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. या तरुणीला संस्थात्मक अलगीकरण कक्षात राहण्याच्या सूचना देऊनही ती घरीच थांबली होती, त्यामुळेच प्रशासनाची चिंता वाढली आहे.

 रेडझोन मधून तसेच अन्य जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने कोल्हापुरात बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व व्यक्तींची सक्तीने तपासणी केली जाते तसेच त्यांना आवश्यकतेनुसार संस्थात्मक किंवा गृह अलगीकरण करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अशा वाढलेल्या रुग्णापासून इतरांना धोका कमी आहे. परंतु विक्रमनगरातील तरुणी संस्थात्मक अलगीकरणाचा सल्ला धुडकावून ती घरी गेली आणि तेथेच वास्तव्य केले. त्यामुळे तिच्यापासूनचा धोका वाढलेला आहे.

ही तरुणी सातारा येथे नातेवाईकांकडे गेली होती. लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर तिचे वडील तिला मागच्या गुरुवारी (दि. १४ मे) घेऊन कोल्हापूरला आले होते. त्यावेळी या तरुणीची सीपीआर रुग्णालयात तपासणी करुन स्वॅब घेण्यात आला.

संशय आल्यामुळे तिला संस्थात्मक अलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला. परंतू ती प्रशासनाची दिशाभूल करुन विक्रमनगरातील घरी गेली. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला तेंव्हा ती घरीच असल्याची बाब समोर आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर