सडोली (खालसा) : कुर्डू (ता. करवीर) येथील राजाराम दादू पाटील (८४) व शकुंतला राजाराम पाटील (७७) या पती-पत्नीचा आठवड्याभरात कोरोनाने मृत्यू झाला. राजाराम पाटील हे माजी सैनिक होते. या पती-पत्नीच्या निधनाने कुर्डू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मूळचे कुर्डू (ता. करवीर) येथील रहिवासी असलेले राजाराम पाटील हे नोकरीनिमित्ताने हळदी (ता. करवीर) येथे स्थायिक झाले होते. राजाराम पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर सुरुवातीला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालय व नंतर सीपीआरमध्ये उपचार सुरु होते. त्यांचे २४ जून रोजी उपचार सुरू असताना निधन झाले. त्यानंतर कोरोना संसर्ग झालेल्या त्यांच्या पत्नी शकुंतला राजाराम पाटील यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरु होतेे. गुरुवारी त्यांचीही प्राणज्योत मालवली. महादेव पाटील यांचे ते चुलता व चुलती होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
०३ राजाराम पाटील, ०३ शकुंतला पाटील