शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 19:05 IST

CoronaVIrus Kolhapur : कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सीजनची मागणी वाढली आहे ही वाढती मागणी पूर्ण करताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत होत असून प्रशासनाने सर्व रुग्णालयांना ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सुचना शनिवारी दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची बैठक घेवून त्यांना याबाबत अलर्ट केले आहे.

ठळक मुद्देऑक्सीजनचा काटकसरीने वापर कराजिल्हा प्रशासनाच्या रुग्णालयांना सुचना

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सीजनची मागणी वाढली आहे ही वाढती मागणी पूर्ण करताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत होत असून प्रशासनाने सर्व रुग्णालयांना ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सुचना शनिवारी दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची बैठक घेवून त्यांना याबाबत अलर्ट केले आहे.सध्या जिल्ह्यात ५० टन ऑक्सीजनची मागणी असतान ४० टनापर्यंत ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. बेल्लारीतून ऑक्सीजन पुरवठा बंद झाल्यानंतर शनिवारपासून पुणे व रायगड येथून ऑक्सीजन पुरवठा सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाचा जीव भांड्यात पडला असला तरी रोज वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्याचे संकट समोर आहेच.

त्यामुळे पुढचा टँकर कोल्हापुरात दाखल होईपर्यंत अधिकारीच ऑक्सीजनवर असतात. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वितरकांचीही बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर